Gold-Silver Rate Today, 29 August 2022: डॉलरच्या दबावामुळे सोन्याच्या भावात घसरण, चांदीही उतरली, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 29 August 2022: सोन्याच्या भावात (Gold Price) आज घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनच्या (US Fed) इशाऱ्यानंतर सोन्याच्या भावावर दबाव आला आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी महागाईला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या कडक भाष्यानंतर भविष्यात अमेरिकेतील व्याजदरात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डॉलरच्या मूल्यात वाढ झाली आहे. परिणामी सोन्याच्या भावावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी महागाईला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या कडक भाष्यानंतर भविष्यात अमेरिकेतील व्याजदरात वाढ होणार हे स्पष्ट झाले
  • सोन्याच्या भावावर मोठा दबाव निर्माण झाला आहे.
  • डॉलर निर्देशांक उच्चांकी पातळीच्या जवळ पोचला आहे.

Gold and Silver Rate Today, 29 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price) आज घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनच्या (US Fed) इशाऱ्यानंतर सोन्याच्या भावावर दबाव आला आहे. फेडरल रिझर्व्हचे चेअरमन पॉवेल यांनी महागाईला आळा घालण्यासंदर्भात केलेल्या कडक भाष्यानंतर भविष्यात अमेरिकेतील व्याजदरात वाढ होणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे डॉलरच्या मूल्यात वाढ झाली आहे. परिणामी सोन्याच्या भावावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. अमेरिकन शेअर बाजारातदेखील (Share Market) याची नकारात्मक प्रतिक्रिया उमटत बाजार गडगडला आहे. गेल्या महिन्यात डॉलरचा निर्देशांक दोन दशकांच्या 109.29 या उच्चांकी पातळीवर पोचला होता. आता पुन्हा डॉलर निर्देशांक या पातळीच्या जवळ पोचला आहे. त्यामुळे डॉलर व्यतिरिक्त इतर चलनात सराफा व्यवहार करणाऱ्यांसाठी सोने बाळगणे अधिक महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावावर दबाव राहण्याचीच चिन्हे आहेत. (Gold Price and Silver price fall amid strong strong index)

अधिक वाचा : The Great Khali : WWE स्टार खलीचा आजही जलवा कायम, आहे गडगंज संपत्तीचा मालक

सोन्याचा ताजा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स घसरले होते. त्यात 0.52 टक्क्यांची घसरण होत ते 266 रुपयांनी घसरून प्रति 10 ग्रॅम 50,972 रुपयांच्या पातळीवर आले. मात्र, चांदीचा वायदा 1.31 टक्क्यांनी घसरून 733 रुपये प्रतिकिलो 55,037 झाला. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने 51,668 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर होते. तर चांदीची किंमत 55,607 रुपये प्रति किलो इतकी होती. 12 ऑगस्टपासून सोन्याच्या स्पॉट किमती प्रति 10 ग्रॅम 800 रुपयांनी घसरल्या आहेत तर याच काळात चांदीचा भाव 2,750 रुपये प्रति किलो घसरला आहे.

जगभरातील मध्यवर्ती बँकांना सार्वजनिक विश्वास गमावण्याचा धोका आहे आणि त्यांनी आता महागाईचा सामना करण्यासाठी कठोरपणे काम केले पाहिजे. यामुळे जरी अर्थव्यवस्थांना मंदीत ओढले जाण्याची भीती असली तरी कठोर पावले उचलायला हवीत, असे मत युरोपियन सेंट्रल बँकेच्या बोर्ड सदस्य इसाबेल श्नाबेल यांनी व्यक्त केल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे.

अधिक वाचा : Weight Loss: वजन कमी करताना Breakfast मध्ये खाऊ नका या गोष्टी, नाहीतर होईल उलटा परिणाम

जाणकारांचे मत

अॅक्सिस सिक्युरिटीजच्या कमोडिटीजचे प्रमुख प्रीतम पटनाईक, म्हणाले की, अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या चेअरमनद्वारे कोणत्याही धोरणात शिथिलता पूर्णपणे काढून टाकली जाईल या आशेने, सोन्याच्या किमतींना काही प्रमाणात फटका बसला आहे. "पॉवेलने स्पष्ट केले की फेड आपल्या कडक धोरण महागाईचा दर चार दशकांच्या उच्चांकावरून कमी होईपर्यंत चालू ठेवेल. फेड प्रमुखांनी असेही सांगितले की सप्टेंबरचा दर वाढीचा निर्णय संबंधित आकडेवारीवर अवलंबून असेल.

अधिक वाचा : Biggest Accident : रनवेवर झाली होती दोन विमानांची समोरासमोर टक्कर, 583 प्रवाशांचा मृत्यू

बाजारातील खरेदीचा ट्रेंड

जागतिक बाजारातील किंमतीतील घसरणीमुळे खरेदीला प्रोत्साहन मिळाल्याने सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनमधील सोन्याचे प्रीमियम गेल्या आठवड्यात ऑक्टोबरनंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोचले. तर खरेदीदार मोठ्या किंमतीत घट होण्याची वाट पाहत असताना भारतात मागणी थंडावली.

जागतिक बाजारपेठेतील ट्रेंड

शुक्रवारी 1.2 टक्क्यांनी घसरल्यानंतर स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी घसरून 1,732.17 डॉलर प्रति औंस झाले. अमेरिकन सोने फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून 1,745.3 डॉलरवर बंद झाले. स्पॉट सिल्व्हर 1 टक्क्यांनी घसरून 18.69 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 1 टक्क्यांनी घसरून 855.27 डॉलर आणि पॅलेडियम 2,110.19 डॉलरवर स्थिर होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी