Gold-Silver Rate Today, 23 August 2022: भारतात आज सोन्याचे भाव एका महिन्यातील नीचांकीवर, चांदी आणखी घसरली, चेक करा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 23 August 2022: जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक चिन्हांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Price)घसरण होते आहे. याचा परिणाम देशातील सोन्याच्या भावावरदेखील होतो आहे. भारतातील सोन्याचे भाव एका महिन्यातील नीचांकी पातळीवर आले आहेत. तर चांदीची (Silver Price) अलीकडील घसरण सुरूच आहे. बाजारातील गुंतवणुकदार इक्विटी आणि कमोडिटीजसारख्या जोखमीच्या मालमत्तेपासून अमेरिकन डॉलरसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळताना दिसत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव अस्थिर 
थोडं पण कामाचं
  • जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक चिन्हांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Price)घसरण
  • महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका अधिक कडक आर्थिक धोरण सुरू ठेवतील या अपेक्षेने सोन्या-चांदीच्या भावावर दबाव
  • अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याचे आकर्षण घटले

Gold and Silver Rate Today, 23 August 2022 : नवी दिल्ली : जागतिक बाजारपेठेतील नकारात्मक चिन्हांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Price)घसरण होते आहे. याचा परिणाम देशातील सोन्याच्या भावावरदेखील होतो आहे.  भारतातील सोन्याचे भाव एका महिन्यातील नीचांकी पातळीवर आले आहेत. तर चांदीची (Silver Price) अलीकडील घसरण सुरूच आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX), सोन्याचे वायदे प्रति 10 ग्रॅम 51,175 रुपयांच्या पातळीवर स्थिर होते तर चांदीचे वायदे 0.13% घसरून 54,920 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होते. (Gold price at lowest in a month, silver price continue to drop)

अधिक वाचा : Asia cup 2022: आशिया कपमध्ये विराट कोहलीला करणार माय-लेक चिअर; विराट, अनुष्का दुबईसाठी रवाना सोबतीला आहे रोहितही

जागतिक घटक

जागतिक बाजारात सोन्याचे दर मागील सत्रात जवळपास एक महिन्याच्या नीचांकी पातळीवर घसरल्यानंतर प्रति औंस 1,738.90 डॉलरवर पोचले. अमेरिकन डॉलरची  ताकद वाढली असून ती इतर चलनांच्या तुलनेत एक महिन्याच्या उच्चांकाच्या जवळ आहे. तर अमेरिकेतील बॉंडचा परतावा वाढला आहे. या घटकांमुळे सोन्याच्या भावावर दबाव निर्माण झाला आहे. इतर मौल्यवान धातूंपैकी स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून 19.04 डॉलर प्रति औंस तर प्लॅटिनम 0.3% वाढून 877.70 डॉलरवर पोचले.

आर्थिक वाढ आणि महागाईची चिंता

वाढीच्या चिंतेमुळे आणि महागाई नियंत्रणात आणण्यासाठी मध्यवर्ती बँका अधिक कडक आर्थिक धोरण सुरू ठेवू शकतील या अपेक्षेमुळे जोखीम भावना निर्माण झाली आहे. जोखीम टाळण्यामुळे बाजारातील गुंतवणुकदार इक्विटी आणि कमोडिटीजसारख्या जोखमीच्या मालमत्तेपासून अमेरिकन डॉलरसारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराकडे वळताना दिसत असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. 

अधिक वाचा : Clean your specs : चष्मा साफ करण्यासाठी या वस्तूंचा करा वापर, काचा होतील चकाचक

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांच्या मिश्र टिप्पण्या दर्शवितात की मध्यवर्ती बँक पुढील हालचाली निश्चित करण्यासाठी आर्थिक वाढ आणि महागाईवर चर्चा करत आहे. महागाई अजूनही नियंत्रणाबाहेर असल्याने, दर वाढ चालू राहण्याची शक्यता आहे. परंतु वाढत्या वाढीच्या चिंतेमध्ये अमेरिकन फेड अधिकारी दर वाढीच्या गतीवर चर्चा करत आहेत. दर वाढीमुळे रोकड कमी होऊ शकते आणि आर्थिक वाढीस अडथळा निर्माण होऊ शकतो या चिंतेमुळे जोखीम भावना निर्माण झाली आहे

सोन्याचे आकर्षण घटले

मजबूत यूएस डॉलरमुळे इतर चलने असलेल्या खरेदीदारांसाठी सोने अधिक महाग होते. फेड अधिकार्‍यांच्या अलीकडील टिप्पण्यांमुळे यूएस डॉलर मजबूत झाला असून बुलियनचे सुरक्षित-आश्रयस्थान म्हणून आकर्षण कमी झाले आहे. सोन्याचे व्यापारी आता या आठवड्याच्या अखेरीस फेडच्या जॅक्सन होल, वायोमिंग, जागतिक मध्यवर्ती बँकर्सच्या परिसंवादावर लक्ष केंद्रित करतील.

अधिक वाचा : Rahul Dravid Corona Positive: राहुल द्रविड कोरोना पॉझिटिव्ह, आशिया चषकापूर्वी भारताला धक्का

गोल्ड ईटीएफमधील गुंतवणुकीचा प्रवाह कमी राहिला. जगातील सर्वात मोठे सोन्याचे-समर्थित एक्सचेंज-ट्रेडेड फंड असलेल्या, SPDR गोल्ड ट्रस्टचे होल्डिंग्स,  शुक्रवारी 989.01 टनांवरून सोमवारी 0.15% घसरून 987.56 टन झाले. अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या अधिकार्‍यांच्या बेताल वक्तव्यामुळे सोन्याच्या भावात घसरण सुरूच आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह महागाईला नियंत्रणात ठेवण्यासाठी आक्रमकपणे आर्थिक धोरण राबवण्याच्या भूमिकेवर ठाम आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी