Gold Price Today: सोनेच्या भावात घट, जाणून घ्या मुंबईत काय आहे रेट...

काम-धंदा
Updated Jul 09, 2019 | 19:06 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Price : सोन्याच्या भावत आज मोठी घट दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर कमी झाल्याने आज स्थानिक बाजारातही सोन्याच्या दरात घट दिसून आली. जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव 

gold price in mumbai
सोन्याचा मुंबईतील दर   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • सोन्याचे भावात आज मोठी घट दिसून आली
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर भावात घट आल्याने घट 
  • भारतात सोन्यावर २.५ टक्के आयात कर वाढविण्यात आला 

नवी दिल्ली :  सोन्याच्या दरात आज मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. कमकुवत वैश्विक संकेत आणि भाव वाढल्याने आज सोन्याची मागणी कमी झाली त्यामुळ भावात घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचे दर ६०० रुपयांनी कमी झाले तर चांदीच्या दरात प्रति किलो ४८ रुपयांची घट दिसून आली.  मुंबईत सोन्याचे दर २४ कॅरेट सोन्यासाठी प्रति १० ग्रॅमसाठी ३४५८० आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमसाठी ३२८१० इतका आहे. 

दिल्लीत सोन्याचा भाव ६००० रुपयांनी कमी होऊन ३४८७० रुपये झाला. आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव कोसळून १३९२ डॉलर वर खाली आला. तर चांदीचा भाव १५ डॉलर प्रति औंसवर खरेदीसाठी होता. 

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे कमोडीटी रिसर्च हेड हरीश वी नुसार सोन्याचा भाव १४०० डॉलर खाली हा डॉलर मजबूत झाल्यामुळे पोहचला. डॉलरचा भाव ३ आठवड्यात वाढ दिसून आली.  डॉलरमध्ये मजबूत होण्यामागे अमेरिकेत व्याज दर घटविण्याची शक्यता कमी झाली. 

हरीश व्ही यांनी सांगितले की ड्यूटीमध्ये वाढ करण्यात आल्याने जगातील दुसऱ्या क्रमांकांच्या ग्राहक असलेल्या भारतातून सोन्याला मागणी कमी झाली. गेल्या आठवड्यात ५ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सोन्यावरील आयात कर २.५ टक्क्यांनी वाढविल्यानंतर आता १२.५ टक्के झाला आहे. 

दुसरीकडे अमेरिकेत रोजगाराचे चांगले आकडे आल्याने फेडरल रिझर्वने व्याज दर कमी करण्याची शक्यता झाली आहे. यामुळे सोन्याच्या दरात कमजोरी दिसून आली आहे. 

आखिल भारतीय सराफा संघानुसार ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोनाचा दर प्रत्येकी ६०० रुपयांनी कमी झाला आहे. त्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३४ हजार ८७० आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ३४ हजार ७०० रुपये झाला आहे. गिन्नीचा भाव २७३०० रुपये प्रति ८ ग्रॅम स्थिर राहिला आहे. 

चांदीच्या दर ४० रुपयांनी कमी होत ३८.९०० रुपये किलो झाला आहे. तर चांदीचे शिक्के लिवाल ८१ हजार आणि बिकवाल ८२ हजार प्रती शेकडावर स्थीर राहिले. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी