सोने आज झाले स्वस्त, जाणून घ्या भाव 

काम-धंदा
Updated Sep 30, 2019 | 20:12 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने आणि चांदी आज स्वस्त झाले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्याने आणि रुपयामुळे सोने आणि चांदीच्या भावात घट दिसू आले आहे. जाणून घ्या आज सोने आमि चांदीचा रेट काय आहे. 

gold price big fall rs 240 silver big fall rs 775 delhi sarafa 30 sept business news in marathi
सोने आज झाले स्वस्त, जाणून घ्या भाव  

नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या भावात सोमवारी घट दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात २४० रुपये घट दिसून आली. तर चांदीचा दर ७७५ रुपये घट दिसून आली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारासंबंधी बोलणी पुढे जात आहे. चीनचे उपपंतप्रधान लियू ही अमेरिकेसोबत बोलणी करण्यासाठी स्वतः अमेरिकेला जाणार आहेत. 

आज आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने आणि चांदीच्या भावात कमजोरी दिसून आली. त्यामुळे भारतात हाजीर बाजारात आणि MCX वर त्याचा परिणाम जाणवला. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव २४० रुपये प्रति १० ग्रॅमला खाली आला आहे. ३८५३० रुपये झाला आहे. 

या पद्धतीने चांदीचा भाव ७७५ रुपये खाली येऊन ४५७०५ रुपये खाली आला आहे. शनिवारी चांदीचा भाव ४६४८० रुपये प्रतिकिलो होता. २४ कॅरेट सोन्याचा भाव शनिवारी ३८७७ रुपयांवर बंद झाला होता. 

आज रुपयाचे मूल्य डॉलरच्या तुलनेत कमी झाल्याने भाव जास्त खाली जाण्यात ब्रेक लागला. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा भाव खाली जाऊन १४८७ डॉलर आणि चांदीचा भाव १७.२४ डॉलर प्रति औंस ट्रेड करत होता. 

सोमवारी रुपयांत ७ पैशांची घट दिसून आली. डॉलरचा भाव ७०.६३ रुपये झाला आहे. MCX वर सोने आणि चांदीमध्ये घट दिसून आली. MCX वर सोन्याचा भाव ३५७ रुपयांनी कमी होऊन ३७३९३ झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...