सोन्याच्या भावात मोठी घट, जाणून घ्या आजचा भाव 

काम-धंदा
Updated Sep 26, 2019 | 19:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण दिसून आली. दिल्लीत सोने आणि चांदीच्या दरात घट झाली. जाणून घ्या किती आहे सोने, चांदीचा दर 

gold price big fall rs 497 silver big fall rs 1580 delhi sarafa 26 sept business news in marathi
सोन्याच्या भावात मोठी घट, जाणून घ्या आजचा भाव   |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  • गुरूवारी सोन्याचा भावात ४९७ रुपयांची घसरण
  • सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किंमतीत तांत्रिक सुधार आला आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्येही सोन्याचा दर कमी होता.

नवी दिल्ली :  कमकुवत वैश्विक कलानंतर दिल्लीच्या सराफा बाजारात गुरूवारी सोन्याचा भावात ४९७ रुपयांची घसरण दिसून आली. त्यामुळे प्रति १० ग्रॅमला सोन्याच्या दर ३८, ६८५ रुपये पर्यंत खाली आला. 

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या अंदाजानुसार चांदीच्या किंमतीतही १५८० रुपयांची घसरण दिसून आली. त्यामुळे चांदीचा दर प्रति किलोला ४७,२३५ रुपये पर्यंत खाली आला. 

बुधवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भावर ३९ हजार १८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. एचडीएफसी सिक्युरिटीजचे देवर्ष वकील यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये हाजीर सोने आणि हाजिर कॉमेक्स सोन्यात काल सायंकाळी विक्री झाली त्यामुळे सकाळी सोने कमी दराने ओपन झाले. 

सणासुदीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किंमतीत तांत्रिक सुधार आला आहे. त्यामुळे आगामी काळात तेजी येऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर न्यूयॉर्कमध्येही सोन्याचा दर कमी होता. १५०८ डॉलर प्रति औंस तर चांदीतही घट दिसून आली. चांदी प्रति औंस १७.९० डॉलर प्रति औंसवर बोली लागली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी