कमी झाली सोन्या-चांदीची किंमत, इतक्या रुपयांवर पोहचला सराफा बाजार 

काम-धंदा
Updated Nov 05, 2019 | 21:53 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold price :  रुपयांच्या मूल्यात सुधार झाल्यावर सोन्या चांदीचे भाव कमी झाले आहे. दिल्लीमध्ये सराफा बाजारात मंगळवारी सोने आणि चांदीच्या भावात घट दिसून आली. जाणून घ्या काय आहे सोन्या-चांदीचा भाव...

gold price down by rs 101 silver by rs 29 on 5 november business news in marathi google batmya newsstand
कमी झाली सोन्या-चांदीची किंमत, इतक्या रुपयांवर पोहचला सराफा बाजार   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  रुपयांच्या मूल्यांत सुधार झाल्याने आणि जागतिक बाजारात विक्री झाल्यामुळे मंगळवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा दर १०१ रुपयांनी कमी होऊन १० ग्रॅमसाठी हा दर ३९,२१३ रुपये झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. यापूर्वी काल बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा दर प्रति १० ग्रॅमला ३९,३१४ रुपयांवर बंद झाला होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, जोखीम पाहता व्यापाऱ्यांच्या धारणा होती की मंदीमुळे जागतिक सुवर्ण बाजारात विक्री होणार आहे. तसेच रुपयातही या दरम्यान सुधार झाला. त्यामुळे दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत कमी झाली. व्यापाऱ्या दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये नऊ पैशांची तेजी दिसू आली. 

चांदीमध्येही २९ रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे एक किलो चांदीचा दर ४७, ५८३ रुपये होता. काल हा दर ४७६१२ रुपये प्रति किलोसाठी होता. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या व्यापार कराराची प्रगती पाहता जोखीमयुक्त धारणा आहे, त्यामुळे सोन्चायी आंतरराष्ट्रीय किंमत कमी झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...