बजेटपूर्वी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत 

Gold Price Today: केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी सोन्याच्या भावात घट दिसून आली आहे. रुपया मजबूत झाल्याने स्थानिक बाजारात सोन्याच्या दरात घट झाली.  जाणून घ्या सराफा बाजाराचा ताजा रेट 

gold price down by rs 131 silver up by 89 on 31 january business news in marathi tbus 44
बजेटपूर्वी स्वस्त झाले सोने, जाणून घ्या सोन्या-चांदीची किंमत   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली : शुक्रवारी सोन्याच्या दरात घट झाली तर चांदीच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत सोन्याचा भावात १३१ रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४१ हजार ४५३ झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्याचा भाव ४१ हजार ५८४ होता. 

दुसरीकडे चांदीच्या दरातही वाढ दिसून आली. चांदीचा दर ८९ रुपयांनी वाढून प्रति किलो ४७ हजार ५५४ रुपये पोहचला आहे. गेल्या कारोबारी सत्रात ४६ हजार ४६५ रुपयांवर चांदी बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, रुपयाच्या मुल्यात झालेल्या वाढीमुळे राजधानी दिल्ली २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव १३१ रुपयांनी खाली आले. बजेटपूर्वी सोन्याचा दर खाली आला आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,७०० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३९,८००  रुपये प्रति १० ग्राम

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ४०,७०० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४०,८०० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४९,८५० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,८१० रुपये प्रति १ किलो

दरम्यान, हाजीर सुपया बजेट सादर होण्यापूर्वी  १२ पैशाच्या मजबुतीसह डॉलरच्या तुलने खुला झाला. दिवसाच्या कारभारात रुपया डॉलरच्या तुलने १७ पैशांनी मजबुतीसह ७१.४1 च्या स्तरावर पोहचला होता. आंतरराष्टीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरातही तेजी दिसून आली. 

सोन्याचा हा भाव या ठिकणी १५७७ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १७.८६ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहचला. वायदा कारभारात सोने ३१९ रुपये घटीसह ४० हजार ६५६ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहचला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी