सोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव 

काम-धंदा
Updated Oct 18, 2019 | 20:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Rate Today: जागतिक मागणी कमकुवत झाल्याने आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्याच्या भावात घट आली आहे. जाणून घ्या आज का होता सोने चांदीच्या भाव... 

gold price down by rs 145 per 10 gram silver by rs 315 on 18 october in delhi sarafa business news in marathi google batmya
सोने, चांदी झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा भाव  

नवी दिल्ली :  कमकुवत जागतिक मागणी आणि रुपया मजबूत झाल्याने सोन्यात घट दिसून आली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार कमी जागतीक मागणीमुळे शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव १४५ रुपये प्रती १० ग्रॅमची घट दिसून आली. ३८९२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला आहे. गुरूवारी सोन्याचा भाव ३९,०७० रुपये प्रति १० ग्रॅम होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ट जिंस विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटले की, दिल्ली सराफा बाजारमध्ये २४ कॅरेटसाठी स्पॉट सोन्याची किंमत १४५ रुपयांची घट दिसली ३८, ९२५ रुपयांवर बंद झाले. कमकुवत मागणी आणि रुपयात आलेली मजबूती मुळे सोन्याच्या भावात घट आली आहे. दिवसात रुपयाच्या मूल्यात ५ पैसे मजबूती मिळाली आहे. 

चांदीच्या किंमती ३१५ रुपये प्रति किलोग्रॅमची घट झाली आहे.  त्यानंतर चांदी ४६,३२५ रुपये प्रति किलोग्रॅम भावावर बंद झाली. गेल्या कारोबारी दिवसात चांदीचा भाव ४६,६४० रुपये प्रती किलोग्रॅम होता. 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भावात घट दिसून आली. १४८८ डॉलर प्रती औंसवर खाली आला आहे. चांदीचा भाव १७.४६ डॉलर प्रति औंस राहिला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी