Gold Price Today: सोन्याच्या किंमती सातत्याने घसरण, इतक्या रुपयांवर पोहचला दर 

Gold Price: सोन्याच्या किंमतीत सोमवारी घट दिसून आली. एशिया स्टॉक्सने गेल्या १९ महिन्यातील सर्वाधिक उच्चतम स्तर गाठल्यामुळे ही घट दिसून आली. अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार करार होण्याची बातमी समोर आली आहे. 

gold price down by rs 171 on 13 january 2020 in sarafa bazar mumbai gold rate business news in marathi
Gold Price Today: सोन्याच्या किंमती सातत्याने घसरण, इतक्या रुपयांवर पोहचला दर  

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या दरात सोमवारी अनेक कारणांमुळे घट दिसून आली.
  • एशियन स्टॉक्सचे शेअर गेल्या १९ महिन्यातील आपल्या उच्चतम पातळीवर पोहचले
  • तणाव कमी झाल्याने सोन्याच्या किंमती गेल्या सात दिवसात १५९० रुपयांनी कमी झाल्या आहेत. 

नवी दिल्ली :  सोन्याच्या दरात सोमवारी अनेक कारणांमुळे घट दिसून आली. कमकुवत वैश्विक कलामुले व्यापाऱ्यांनी आपले सौदे कमी केल्यामुले सोन्याचा भाव १७१ रुपयांनी कमी होऊ ३९७०० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचला. या शिवाय बीजिंग आणि वॉशिंग्टन यांच्या व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्याच्या बातमीनंतर एशियन स्टॉक्सचे शेअर गेल्या १९ महिन्यातील आपल्या उच्चतम पातळीवर पोहचले. दोन्ही मोठ्या देशात व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्याने गुंतवणूकदारांनी धोक्याला बाजुला सारून आपल्या पैशाची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे चांदीच्या दरात २६१ रुपयांनी घसरून प्रति किलो ४६ हजार ६५० रुपयांवर बंद झाली. 

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याचा फेब्रुवारीचा करार १७१ रुपये म्हणजे ०.४३ टक्क्यांच्या नुकसानासह ३९,७०० रुपये प्रति १० ग्रॅम राहिला. यात २१४५ लॉट कारभार झाला. याशिवाय सोन्याचा एप्रिल महिन्याचा करार २३२ रुपये म्हणजे ०.५८ टक्के घटीसह ३९ हजार ८२२ रुपये प्रती दहा ग्रॅम राहिला. यात ४४१ लॉट कारभार झाला. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३८,८०० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३९,०१० रुपये प्रति १० ग्राम

 

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,८०० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४०,०१० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४९,००० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,१६०  रुपये प्रति १ किलो

 

जागतिक बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने ०.३० टक्के घटीसह १५५५.४० डॉलर प्रति औंसवर खाली गेले. गेल्या आठवड्यात अमेरिका आणि इराण यांच्या होणारी तणावाची परिस्थिती गोल्ड फ्यूचर रेट ४१ हजार २९३ रुपये प्रति दा ग्रॅमवर पोहचला होता. तणाव कमी झाल्याने सोन्याच्या किंमती गेल्या सात दिवसात १५९० रुपयांनी कमी झाल्या आहेत. 

पश्चिम आशियातील तणावामुळे सोन्याच्या किंमतीत चढ-उतार दिसून आले. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे तीन जानेवारीला अमेरिका हल्ल्यामध्ये इराणचे शीर्ष कमांडर कासिम सुलेमानी यांच्या हत्या झाली. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने अमेरिकन सैनिक ठिकाण्यांवर हल्ला केला. त्यामुळे या परिसरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. यामुळे तेल आणि सोन्याची किंमती वाढल्या होत्या. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी