सोने-चांदीच्या दरात घट, इतक्या रुपयांवर पोहचला भाव 

Gold Price Today: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या भावात घट दिसून आली आहे.  सोने आणि चांदीच्या दरात घट जागतिक स्तरावरील कमी मागणीमुळे आली आहे. जाणून घ्या सोन्याचा दर 

gold price down by rs 281 silver by rs 712 on 3 february 2020 in delhi and mumbai business news in mumbai
सोने-चांदीच्या दरात घट, इतक्या रुपयांवर पोहचला भाव   |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली :  आठवड्याच्या पहिल्या दिवशी आणि बजेट सादर झाल्यानंतर सोमवारी सोने आणि चांदीच्या दरात घट दुसू आली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भावात २८१ रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४१ हजार ७४८ झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्याचा भाव ४२ हजार ०२९ होता. 

दुसरीकडे चांदीच्या दरातही घट दिसून आली. चांदीचा दर ७१२रुपयांनी घसरून प्रति किलो ४७ हजार ५०६ रुपये पोहचला आहे. गेल्या कारोबारी सत्रात ४८ हजार ४२१८रुपयांवर चांदी बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, कमकुवत जागतिक कल आणि रुपयात झालेली घट यामुळे राजधानी दिल्ली २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव २८१ रुपयांनी खाली आले. बजेटनंतर सोन्याचा दर खाली आला आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,८५० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ४००१०  रुपये प्रति १० ग्राम

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ४०,८५० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४१,०१० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४९,००० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,९९० रुपये प्रति १ किलो


सोन्याचा हा भाव या ठिकणी १५७८ डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १७.७८ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहचला.  २०२०-२१ चा अर्थ संकल्पावर निराशा दिसून येत आहे. त्यामुळे डॉलरच्या तुलने सोमवारी रुपया ३४ पैसे तुटला आणि ७१.६६ रुपयांवर खुला झाला होता. 

वायदा कारभारात सोने५५ रुपये घटीसह ४० हजार ८९३ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहचला. याचे मुख्य कारण सट्टेबाजांनी आपल्या सौद्यात घट करणे आहे. एमसीएक्सवर फेब्रुवारी डिलिव्हरी सोन्यासाठी सोन्याचा वायदा भाव ३५५ रुपयांनी ०.८६ टक्के खाली जाऊन ४० हजार ८९३ रुपये प्रति १० ग्रॅवर पोहचला आहे. त्याचबरोबर एप्रील डिलीव्हरीसाठी हा भाव १८९ रुपये म्हणजे ०.४६ टक्के घटून प्रती १० ग्रॅमसाठी ४१, ०१६ झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी