सलग दुसऱ्या सोन्याच्या किंमती झाल्या कमी, जाणून घ्या भाव

Gold Price Today: जागतिक स्तरावर झालेली विक्री आणि रुपयात आलेली तेजी यामुळे  सोने आणि चांदीच्या भावात घट दिसून आली आहे.  जाणून घ्या सोन्याचा दर 

gold price down by rs 388 silver by rs 346 on 4 february 2020 in delhi mumbai business news in marathi
सलग दुसऱ्या सोन्याच्या किंमती झाल्या कमी, जाणून घ्या भाव 

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली विक्री आणि रुपयात आलेल्या तेजीमुळे मंगळवारी सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून आली. राजधानी दिल्लीत सोन्याचा भावात ३८८ रुपयांची घट दिसून आली. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा भाव ४१ हजार २७० झाला. एचडीएफसी सिक्युरिटीने ही माहिती दिली आहे. सोमवारी सोन्याचा भाव ४१ हजार ६५८ होता. 

दुसरीकडे चांदीच्या दरातही घट दिसून आली. चांदीचा दर ३४६ रुपयांनी घसरून प्रति किलो ४७ हजार ०८० रुपये पोहचला आहे. गेल्या कारोबारी सत्रात ४७ हजार ४२६ रुपयांवर चांदी बंद झाली होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे सिनिअर अॅनालिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली विक्री आणि रुपयात आलेल्या तेजीमुळे राजधानी दिल्ली २४ कॅरेट सोन्याचा हाजीर भाव ३८८ रुपयांनी खाली आले. बजेटनंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा दर खाली आला आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,६०० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३९,८५०  रुपये प्रति १० ग्राम

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ४०,६०० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४०,८५० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४८,५०० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,००० रुपये प्रति १ किलो

त्यांनी सांगितले की, रुपया हाजिर बाजारात १८ पैसे मजबुतीसह डॉलरच्या तुलनेत राहिला आहे. मंगळवारी रुपया १९ पैशांनी मजबूत होऊन डॉलरच्या तुलनेत ७१.१९ च्या स्तरावर पोहचला. आंतरराष्ट्रीय बाजारात  सोन्याचा हा भाव १५७० डॉलर प्रति औंस आणि चांदीचा दर १७.७३ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर पोहचला.  तपन यांनी सांगितले की, चीनच्या केंद्रीय बँकद्वारे लिक्विडीटी वाढविण्याचा निर्णयानंतर जागतिक बाजारात स्थीर चीनी सूचकांकामुळे सोन्यात घट दिसून आली. 

वायदा कारभारात सोने २६२ रुपये घटीसह  गोल्ड फ्यूचरचा भाव ४० हजार ४८२ रुपये प्रति दहा ग्रॅम वर पोहचला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये एप्रिलच्या डिलिवरीच्या सोन्चाया भाव २६२ रुपयांनी खाली जाऊन ४० हजार ४८२ रुपये प्रति १०  ग्रॅम राहिला. यामध्ये १८०१९ लॉट कारभार झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी