सोन्याच्या भावात आली घट, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या काय आहे आजचा भाव 

काम-धंदा
Updated Dec 30, 2019 | 18:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Gold Price Today: सोमवारी कमकुवत मागणीमुळे सोन्या-चांदीच्या दरात घट दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात सोने आणि चांदी स्वस्त झाले. जाणून घ्या आजचे भाव... 

  gold price down by rs 73- and silver by rs 156 on 30 december 2019 in delhi business news in marathi
सोन्याच्या भावात आली घट, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या काय आहे आजचा भाव   |  फोटो सौजन्य: Times Now

  नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून आली आहे. सोमवारी कमकुवत मागणीमुळे राजधानी दिल्ली सोन्याचा भाव ७३ रुपये प्रति १० ग्रॅमची घट दिसून आली. त्यामुळे सोन्याचा दर ३९,८८२ रुपये प्रति १० ग्रॅमच्या स्तरावर पोहचला आहे. याची माहिती एचडीएफसी सिक्युरिटीने दिले आहे. गेल्या व्यवहारी दिवसात सोन्याचा भाव ३९९५५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. 
 
 चांदीचा भावातही कमी झाली आहे. चांदीचा भाव सोमवारी १५६ रुपये प्रति किलो ग्रॅमने कमी झाला. त्यानंतर चांदीचा भाव ४७ हजार ९१० रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचला आहे. गेल्या कारोबारी दिवसात ४८,०६६ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. 
 
 आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात किरकोळ घट दिसून आली. येथे सोन्याचा भाव १५१३.५० डॉलर प्रति औंसवर राहिला तर चांदीचा गदर १७.८७ डॉलर प्रति औंसच्या स्तरावर होता. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये सोनेच्या फेब्रुवारी २०२०च्या डिलिव्हरच्या कराराची किंमत ६० रुपय म्हणजे ०.१५ टक्क्यांनी घटून ३९ हजार ०२० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहचला. यात १५६६ लॉट कारभार झाला. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३७,९५० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३७,९५० रुपये प्रति १० ग्राम

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ३८,९५० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ३८,९५० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ४९,३५० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ४९,३०० रुपये प्रति १ किलो


 एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की, सोमवारी सोन्याचा भाव वैश्विक भावात नरमी दिसून आली. सुट्ट्यांचा काळ पाहता सोन्याचा भावात किरकोळ तेजीसह १५१३ डॉलर प्रति औंसच्या जवळपास राहिला. मोतिलाल ओसवाल फायनानशिअल सर्व्हिसेस लिमिटेडचे व्हाइस प्रेसिडेंट नवनीत दमानी यांनी सांगितले, अमेरिका आणि मध्य पूर्वात तणावाच्या परिस्थितीनंतर गुंतवणूकदारांनी सोन्यावर भरवसा दाखवला त्यामुळे सोन्याचा दरात उच्च स्तर गाठला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी