Gold Price Today | स्वस्त झाले सोने... सोडू नका अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या ताजा भाव

Gold rate : लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच यंदा अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) 3 मे रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा जे लोक सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर एक सुवर्ण संधी आहे. सोने आणि चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावात घसरण
  • अमेरिकन बॉंड्सचा परतावा आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे महागाई संदर्भातील धोरण याचा सोन्याच्या किंमतीवर दबाव
  • अक्षय़ तृतियेला सोने खरेदीची मोठी संधी

Gold Price Today 2 May 2022 update : नवी दिल्ली : लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच यंदा अक्षय्य तृतीया (Akshay Tritiya) 3 मे रोजी साजरी होणार आहे. त्यामुळे सोन्याबरोबरच चांदीच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्हालाही लग्नाच्या हंगामात सोने-चांदी खरेदी करायची असेल किंवा जे लोक सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असतील, तर एक सुवर्ण संधी आहे. भारतातील 24 कॅरेट सोन्याचा भाव  (Gold Price)आज, 2 मे, कालच्या खरेदी किंमतीपेक्षा 1,080 रुपयांच्या घसरणीनंतर 51,710 रुपयांवर पोचला आहे. एक किलो चांदीची किंमत (Silver Price) कालच्या तुलनेत 800 रुपयांनी घसरून 62,700 रुपयांना विकली जात आहे. MCX वर सोन्याचे फ्युचर्स 0.88 टक्क्यांनी किंवा 454 रुपयांनी घसरून 51,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले. तर चांदीचा वायदा 1.65 टक्‍क्‍यांनी किंवा 1,059 रुपयांनी घसरून 63,290 रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे. (Gold Price drops amid US treasury yield & US fed policy direction)

राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस यांसारख्या कारणांमुळे सोन्याची किंमत दररोज बदलते. सोमवारी देशभरातील विविध शहरांतील सोन्याचे दर पाहा.

अधिक वाचा : Gold Investment | या अक्षय तृतियेला काय कराल? सोन्यातील गुंतवणकीचे किती आहेत पर्याय? जास्त लाभ मिळवण्यासाठी अशी करा गुंतवणूक...

विविध शहरांतील सोन्याचा भाव

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार मुंबई, नवी दिल्ली आणि कोलकाता येथे 22 कॅरेटचे 10 ग्रॅम सोने 47,400 रुपयांना विकले जात आहे. याच प्रमाणात चेन्नईमध्ये सोने 48,550 रुपयांवर व्यवहार करते आहे. जर आपण 24-कॅरेट सोन्याच्या दरांवर नजर टाकली तर, 10 ग्रॅम जास्त मागणी असलेल्या सोन्याचा भाव नवी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई येथे 51,710 रुपये आहे. चेन्नईमध्ये 24-कॅरेट सोन्याचा भाव 52,970 रुपये आहे. नागपूर आणि सुरतमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 47,480 आणि 47,460 रुपयांवर आहे. 24-कॅरेट शुद्धतेच्या याच प्रमाणाची नागपूरमध्ये किंमत 51,790 रुपये आणि सुरतमध्ये 51,770 रुपये आहे.

अधिक वाचा : 7th Pay Commission | पगारवाढीसाठी येणार नवीन योजना! यापुढे या आधारे वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन...

चांदीची किंमत जाणून घ्या

दुसरीकडे, चांदीबद्दल बोलायचे झाले तर शनिवारपर्यंत जी चांदी 68,800 रुपये किलोने विकली जात होती, ती सोमवारी 68,800 रुपये दराने विकली जाईल. चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

22 आणि 24 कॅरेटमधील फरक जाणून घ्या

24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध आणि 22 कॅरेट सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने आलिशान असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतांश दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

अधिक वाचा : Changes from 1st May | 1 मे पासून महागड्या सिलिंडरपासून बँकांच्या सुट्ट्यांमधील बदल; जाणून घ्या महिना कसा सुरू होईल

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी ISO द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. कॅरेट 24 पेक्षा जास्त नाही आणि कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी