Gold-Silver Rate Today, 01 August 2022: सोन्याच्या भावातील तेजीला लगाम, तर चांदी 58,000 रुपयांच्या खाली, लगेच पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 01 August 2022 : सोन्याचा भाव (Gold Price) पुन्हा एकदा अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर दिसतो आहे. आज सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची भूमिका मवाळ होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे भाव सोमवारी कमी झाले आहेत. परंतु अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव तीन महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ गेले आहेत. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) घसरण झाली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • आज सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची भूमिका मवाळ होण्याची अपेक्षा
  • अमेरिकेतील 10 वर्षांच्या बेंचमार्क बॉंडचा परतावा चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

Gold and Silver Rate Today, 01 August 2022 : नवी दिल्ली: सोन्याचा भाव (Gold Price) पुन्हा एकदा अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर दिसतो आहे. आज सोन्याच्या भावात थोडीशी घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve) व्याजदरात वाढ करण्याची भूमिका मवाळ होण्याच्या अपेक्षेने सोन्याचे भाव सोमवारी कमी झाले आहेत. परंतु अमेरिकन डॉलरच्या मूल्यात झालेल्या घसरणीमुळे सोन्याचे भाव तीन महिन्यांच्या उच्चांकाच्या जवळ गेले आहेत. चांदीच्या भावातदेखील (Silver Price) घसरण झाली आहे. मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX)सोन्याचे फ्युचर्स  0.43 टक्क्यांनी किंवा 224 रुपयांनी कमी होऊन 51,402 रुपये प्रति 10 ग्रॅम वर व्यवहार करत होते. चांदीचा भाव मात्र 0.66 टक्क्यांनी घसरून 383 रुपये प्रति किलोवर 57,987 रुपये राहिला. (Gold price drops marginally and Silver also drops amid less aggressive Federal Reserve rate hike trajectory)

अधिक वाचा : Video: वाहतूक पोलीसच्या गाण्यानं लोकांना बनवलं 'यमला पगला दीवाना', उडवली धमाल, बाबा देत सुटला प्लाईंग किस

अमेरिकन अर्थव्यवस्था आणि व्याजदराचा प्रभाव

ICICIDirect ने आपल्या सकाळच्या अहवालात म्हटले आहे की, वाढत्या महागाई आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या किमतींची वाढ झाली आहे. मात्र अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या सकारात्मक आकडेवारीमुळे सोन्याच्या भावातील पुढील तेजी रोखली आहे. इतर चलन धारकांसाठी सोने कमी महाग करून, प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत डॉलरचे मूल्य तीन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर पोचले आहे. अमेरिकेतील 10 वर्षांच्या बेंचमार्क बॉंडचा परतावा चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे.

अधिक वाचा : Tata Motors : टाटांची ही सर्वात स्वस्त कार लवकरच होणार लॉंच...लक्ष वेधून घेणाऱ्या या कारची किंमतही असणार बजेटमध्ये

भारताने सुरू केले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज

सोन्याचा जगातील दुसरा-सर्वात मोठा ग्राहक असलेल्या भारताने सराफा बाजारपेठेत पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न करत असताना शुक्रवारी आपले पहिले आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज सुरू केले. भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 51,466 रुपयांच्या पातळीवर होते. तर चांदीचा भाव 57,553 रुपये प्रति किलोच्या पातळीवर होता. सोन्याच्या स्पॉट किंमती गेल्या दोन आठवड्यात प्रति 10 ग्रॅम प्रति 1,100 रुपयांनी वाढल्या आहेत. तर याच कालावधीत चांदीचा भाव 2,800 रुपये प्रति किलोपर्यंत पोचला आहे.

अधिक वाचा : Patra Chawl Scam: काय आहे एक हजार कोटी रुपयांचा पत्रा चाळ घोटाळा ? संजय राऊतांचा काय आहे संबंध ?

अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढीसंदर्भातील आक्रमक भूमिका मवाळ झाल्यानंतर सोन्याच्या भाव पुन्हा उसळला आहे. सलग दुसऱ्या तिमाहीत अमेरिकन जीडीपीची आकडेवारी नकारात्मक असल्यामुळे डॉलर निर्देशांक घसरला आहे. या पार्श्वभूमीवर सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकारातील मागणी पुन्हा वाढली आहे. डॉलर इंडेक्स आणि जीडीपीतील घसरण यामुळे अमेरिकन बॉंडचा परतावादेखील घसरला आहे.

जागतिक बाजारपेठ

स्पॉट गोल्ड 6 जुलैपासून शुक्रवारी 1,767.79 डॉलरवर उच्चांक गाठल्यानंतर प्रति औंस 1,764.32 डॉलरवर थोडे घसरले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.1 टक्क्यांनी घसरून 1,779.90 डॉलर प्रति औंस झाले. इतरत्र, स्पॉट सिल्व्हर 0.7 टक्क्यांनी घसरून 20.17 डॉलर प्रति औंस, प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून 893.99 डॉलरवर आणि पॅलेडियम 1.4 टक्क्यांनी घसरून 2,099.68 डॉलरवर आले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी