या वर्षांच्या अखेर इतकी होणार सोन्याची किंमत, जाणून घ्या का वाढणार किंमत 

काम-धंदा
Updated Oct 30, 2019 | 17:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

Gold Price: सोन्याच्या भाव या वर्षाच्या सुरूवातीपासूनच वाढ होत आहे. या वर्षाच्या अखेर सोन्याचा भाव विक्रमी स्तरावर जाण्याची शक्यता आहे. सोन्याचा भाव ४२ हजारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे.

gold price end of the year record break high news in marathi
या वर्षांच्या अखेर इतकी होणार सोन्याची किंमत  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवाळी आणि धनत्रयोदशीला गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी सोन्याची विक्री झाली
  • या वर्षाची सुरूवातीपासूनचे सोन्याच्या किंमती वाढ होताना दिसतेय
  • सोन्याचा भाव या वर्षाच्या अखेरीस ४२ हजार प्रति १० ग्रॅम पोहचण्याची शक्यता

नवी दिल्ली :  भारतीय समाजात सोने आणि चांदीत नेहमी गुंतवणूक ही नेहमी पसंत केली जाते. पण जास्त किंमतीमुळे या सणाच्या  काळात खरेदीचा ओघ कमी होता. पण बाजारातील विश्लेषकांच्या मते या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ४२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होण्याची शक्यता आहे.  जिओपॉलिटिकल टेन्शन, रिझर्व बँककडून झालेली सोन्याची खरेदी आणि रुपयांची किंमत कमी होऊ शकते, त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 

काय म्हणताहेत एक्स्पर्ट... 

मोतीलाल ओसवाल फायनॅशियल सर्व्हिस लिमिटेड आणि कमॉडिटी आणि करेन्सी प्रमुख किशोर नारने यांनी सांगितले की, २०१९ हे सोन्यातून मिळणारा परताव्यासाठी चांगले वर्ष मानले गेले. स्थानिक बाजारातील किंमत १५ टक्क्यांनी वाढली. सणाच्या काळात सोन्याची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाली, परंतु, तरीही सोन्याच्या किंमतीत वाढ होताना दिसली. 

त्यांनी सांगितले की, व्यापार युद्धामुळे सोन्याच्या भावात काही सुधार होणार आहे. सोन्याचा भाव ३९५०० रुपयांवरून  सोन्याचा भाव ४१५०० रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. 

व्यापार युद्धची स्थिती नरम पडल्याने ही तेजी फार जास्त असणार नाही. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सध्याची मंदीच्या वातावरणात केंद्रीय बँकांना बराच काळ उदारिकरणाचे धोरण ठेवावे लागणार आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीला समर्थन मिळण्याची शक्यता आहे. 

Gold Price ४२ हजारांपर्यंत पोहचू शकते सोने

कॉम्ट्रेन्ज रिसर्चचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गगनशेखर त्यागराजन यांनी सांगितले की, पश्चिम एशियामध्ये भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या वैश्विक घाऊक बाजारात सोन्याचा दर १६५० प्रति डॉलर आणि एमसीएक्स ४२००० रुपये जाऊ शकते. एमसीएक्समध्ये सोन्याचे ताजे दर ३७,९४१ प्रति दहा ग्रॅम आणि कॉमेक्सवर १५२०.९ डॉलर सुरू आहे. 

एबेन्स ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक बन्सल यांनी सांगितले की, अमेरिकन खासदारांनी २४ सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या औपचारिर महाभियोगची तयारीनंतर सोन्याला मजबूती आली होती. त्यांनी सांगितले की सोन्याचा हाजीर किंमती वाढ होण्याची आणि १४५८ डॉलरच्या वर जााण्याची शक्यता आहे. 

अमेरिका चीन व्यापार युद्ध आणि जिओपॉलिटीकल टेन्शन 

एमके वेल्थ मॅनेजमेंटचे रिसर्च प्रमुख डॉ. के. जोसेफ थॉमस यांनी सांगितले की, सोने नेहमी मूल्याधारीत गुंतवणूकीचे साधन आहे. गेल्या पाच वर्षांवर नजर टाकली तर गोल्ड रिटर्न गेल्या ५ वर्षात ७ टक्के सीएजीआर राहिले आहेत. सध्याच्या काळात सोनेच्या भाव १४८० आणि १५१० च्या लेव्हल वर आहे. सध्या वैश्विक आर्थिक सुस्ती, अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेले व्यापार युद्ध आणि जिओपॉलिटीकल टेन्शनमुळे सोन्याच्या दरात वाढ होऊ शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी