Gold-Silver Rate Today, 21 July 2022: खरेदीची संधी! सोन्याच्या भावात मोठी घसरण...पोचले नीचांकीवर, पटापट पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 21 July 2022: जागतिक बाजारातील संमिश्र प्रतिसाद आणि चढउतारांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Price) मोठ्या घसरणीचा ट्रेंड आजही कायम आहे. गुरुवारी भारतीय वायद बाजारातील सोन्याचा भाव वर्षभरातील नीचांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर आज चांदीच्या भावातदेखील (Silver Price) 400 रुपयांहून अधिक घसरण दिसून येते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold continues to fall
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात मोठी घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात झाली मोठी घसरण
  • जागतिक बाजारातील ट्रेंडचा सोन्याच्या भावाला फटका
  • चांदीची चमकदेखील उतरली

Gold and Silver Rate Today, 21 July 2022 : नवी दिल्ली : जागतिक बाजारातील संमिश्र प्रतिसाद आणि चढउतारांच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावात (Gold Price) मोठ्या घसरणीचा ट्रेंड आजही कायम आहे. गुरुवारी भारतीय वायद बाजारातील सोन्याचा भाव वर्षभरातील नीचांकी पातळीवर गेला. त्याचबरोबर आज चांदीच्या भावातदेखील (Silver Price) 400 रुपयांहून अधिक घसरण दिसून येते आहे. या सर्व पार्श्वभूमीवर सर्वसामान्य ग्राहकांना सोने खरेदीची संधी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत तुम्हालाही सोने-चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. सोने आणि चांदीचा ताजा भाव आणि त्यामागील कारणे पाहूया. (Gold price fall at lowest level, silver also drops, check latest rates)

अधिक वाचा : EPFO update : ईपीएफओने मे मध्ये जोडले 16.8 लाख नवे सदस्य, नोंदवली 83 टक्क्यांची वाढ

आजचा सोन्या-चांदीचा भाव 

मल्टीकमोडिटी एक्स्चेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेची फ्युचर्स किंमत 250 रुपयांनी घसरून 49,958 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तर MCX वर चांदीची फ्युचर्स किंमत 480 रुपयांनी घसरून 55,130 रुपये झाली. त्याच वेळी, जर आपण सुरुवातीच्या स्थितीवर नजर टाकली तर, याआधी सोन्याचा व्यवहार 50 हजारांच्या पातळीवर खुलेपणाने सुरू झाला होता. परंतु मागणीतील घट आणि जागतिक बाजारातील भावातील घसरणीमुळे लवकरच फ्युचर्सचे भाव 50 हजारांखाली गेले.  दुसरीकडे 55,450 रुपयांवर व्यापार सुरू केल्यानंतर चांदीचा भावही घसरला.

तुमच्या माहितीसाठी सोने एका वर्षातील नीचांकी पातळीवर व्यवहार करते आहे आणि मागील बंद झालेल्या भावापेक्षा सुमारे 0.5 टक्‍क्‍यांनी घसरले आहे. तर चांदी सध्या मागील बंद भावापेक्षा 0.88 टक्‍क्‍यांनी घसरली आहे. आज चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली आहे.

अधिक वाचा : नागरिकांनी बँकांतून पैसे काढू नये म्हणून चीनच्या रस्त्यांवर आणले रणगाडे

जागतिक बाजारपेठेची स्थिती 

आता जागतिक बाजारपेठेकडे लक्ष दिले असता आज जागतिक बाजारातही सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली असून ती एका वर्षातील नीचांकी पातळीवर गेली आहे. आज, अमेरिकन बाजारात स्पॉट सोन्याची किंमत 1,691.40 डॉलर प्रति औंस होती. ही ऑगस्ट 2021 नंतरची सर्वात खालची पातळी आहे. जागतिक बाजारात आज चांदीचा भावही 18.62 डॉलर प्रति औंस झाला.

अधिक वाचा : Govt Jobs News : सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, १० लाख पदांवर होणार भरती

तज्ञांना सद्यस्थितीबद्दल काय वाटते?

सोन्याच्या भावातील चढउतारांबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जागतिक बाजारात डॉलरच्या वाढत्या ताकदीचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावरदेखील दिसून येईल.  याच दबावाखाली सोन्याचा भाव एका वर्षाच्या नीचांकी पातळीवर गेला आहे. बाजारातील वातावरणानुसार, गुंतवणुकदार सध्या फक्त डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि सोन्यात विक्री करत आहेत. त्याचबरोबर भारतीय बाजारपेठेत सरकारने सोन्यावरील आयात शुल्कात वाढ केल्यानंतर त्याचा वापर कमी झाला आहे. त्याचाही परिणाम होत सोन्याच्या भावात आणखी घसरण दिसून येते आहे.

जागतिक स्तरावर सोन्याच्या भावावर मजबूत अमेरिकन डॉलरचा परिणाम होतो आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75% ते 1% वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉलर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक उच्चांकीवर पोचला आहे आणि अमेरिकेतील बॉंडच्या परताव्यातदेखील वाढ झाली आहे. या तिन्ही घटकांचा परिणाम होत सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याबद्दल सध्या नकारात्मक कल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी