Gold Price Today 5 April 2022 : नवी दिल्ली : सोन्या-चांदीच्या किंमतीतील (Gold-Silver Price)घसरण अजूनही सुरूच आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोने 48 रुपयांनी स्वस्त झाले आहे. या घसरणीसह आज सकाळी सोन्याचा भाव (Gold Price) 51485 रुपयांवर आहे. मात्र, आज चांदीच्या भावात(Silver Price) १० रुपयांची किरकोळ वाढ नोंदवण्यात आली. सध्या चांदी 66300 वर व्यवहार करत आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्याचा भाव 55,600 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोचला होता. त्यानुसार एका महिन्याच्या विक्रमी उच्चांकावरून सोने 4,115 रुपयांनी स्वस्त झाले आहे. (Gold price fall continues, good time to buy gold)
अधिक वाचा : Government Scheme | आता सरकार विवाहितांना देणार मोठा लाभ, दरमहा मिळणार 44,793 रुपये
यासोबतच जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. सराफा बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव 48189 रुपयांवर घसरला. त्याच वेळी, 24 कॅरेट सोन्याचा भाव 52570 रुपयांवर होता. याशिवाय 20 कॅरेट सोन्याचा सरासरी भाव 43808 रुपये होता. यासह 18 कॅरेटचा भाव 39428 रुपयांवर पोहोचला असून 14 कॅरेट सोन्याचा दर 30666 रुपयांवर आला आहे.
अधिक वाचा : Indian Railway Update | रेल्वे प्रवाशांना दणका...'या' ट्रेनचे भाडे वाढणार ५० रुपयांनी! जाणून घ्या तपशीलवार माहिती
तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा काळ चांगला आहे. किंबहुना या मौल्यवान धातूंच्या घसरणीचा कल कायम आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia Ukraine War) सातत्याने घसरणीचे वातावरण आहे. यादरम्यान बाजारपेठेची स्थिती हळूहळू सुधारते आहे.
अधिक वाचा : Earning Tips | फक्त 15 मिनिटांसाठी ई-मेल वाचून पैसे कमविण्याची उत्तम संधी, दरमहा करा दणकून कमाई
सोन्याच्या दागिन्यांची किंमत देशभर बदलते, कारण त्यात उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्ज यांचाही वाटा असतो. तुमच्या शहरातील सोन्याची किंमत तपासण्यासाठी तुम्ही इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ची मदत घेऊ शकता. यासाठी तुम्हाला 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या मोबाईल नंबरवर सोन्याच्या ताज्या दराचा संदेश येईल.
22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत तफावत असते. याचे मुख्य कारण म्हणजे सोन्याची शुद्धता. वास्तविक, 24 कॅरेट सोने 99.9 टक्के शुद्ध असते. तर 22 कॅरेट सोने सुमारे 91 टक्के शुद्ध आहे. त्यात 9 टक्के इतर धातू असतात. त्याचबरोबर २४ कॅरेट सोन्यात कोणतीही भेसळ नसली तरी त्यापासून कोणतेही दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे दागिने हे 24 कॅरेट सोन्याचे नसतात.
सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर सरकारने यासाठी अॅप बनवले आहे. त्याचे नाव 'BIS केअर अॅप' अॅप आहे. त्याच्या मदतीने तुम्ही सोन्याची शुद्धता तपासू शकता. या अॅपच्या मदतीने तुम्ही केवळ अचूकता तपासू शकत नाही तर त्यासंबंधीच्या तक्रारीही करू शकता.