सोन्याच्या दरात झाले बदल, जाणून घ्या आजचे रेट 

काम-धंदा
Updated Sep 24, 2019 | 21:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने आणि चांदीच्या भावात गेल्या आठवड्यात घट पाहायला मिळाली. सोन्याचा दर ४ दिवस घटले होते. आज जाणून घ्या काय बदल झाला सोने आणि चांदीच्या दरात... 

gold price gain rs 130 silver big gain rs 900 delhi sarafa 23 sept news in marathi
सोन्याच्या दरात झाले बदल, जाणून घ्या आजचे रेट  

थोडं पण कामाचं

  • मजबूत वैश्विक कल अनुरूप आल्याने दिल्लीत सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात १३० रुपयांची वाढीसह
  • ३८ हजार ६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे
  • शनिवारी २४ कॅरेट भाव ३८ हजार ५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

नवी दिल्ली : मजबूत वैश्विक कल अनुरूप आल्याने दिल्लीत सराफा बाजारात सोमवारी सोन्याच्या भावात १३० रुपयांची वाढीसह ३८ हजार ६९० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. 

एचडीएमसी सिक्युरिटीजनुसार चांदीची किंमत ९०० रुपयांच्या तेजीसोबत ४७९९० रुपये प्रति किलो झाली आहे.  गेला बंद भाव ४७०९० रुपये प्रति किलो ग्रॅम होता. 

शनिवारी २४ कॅरेट भाव ३८ हजार ५६० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. आंतराष्ट्रीय बाजारात न्यूयॉर्कमध्ये सोने तेजीसोबत १५१८ डॉलर प्रि औंस आणि चांदी किंमतीत तेजीसोबत १७.८७ डॉलर प्रति औंस झाली आहे. 

कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि अमेरिका आणि चीन यांच्या होणारे व्यापार युद्धाबाबत चिंतेमुळे गुंतवणूकदारांच्या  शंका असल्यामुळे रुपया सोमवारी नऊ पैशांची किरकोळ घट दिसून आली. ७१.०३ रुपये प्रति डॉलर रुपयाचे मूल्य होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी