सोन्या-चांदीच्या दरात झाले हे बदल, जाणून घ्या आजचा भाव 

काम-धंदा
Updated Sep 25, 2019 | 19:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने आणि चांदीचे भावावर आज कमकुवत रुपयाचा प्रभाव पडला. त्याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात सुरू असलेल्या अस्थिरतेच्या वातावरणाचाही परिणाम जाणविला. जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचे दर 

gold price gain rs 162 silver big gain rs 95 delhi sarafa 25 sept news in marathi
सोन्या-चांदीच्या दरात झाले हे बदल, जाणून घ्या आजचा भाव   |  फोटो सौजन्य: Thinkstock

नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय बाजारात बहूमूल्य धातूंच्या किंमतीत तेजी ही रुपयाचे मूल्य कमी झाल्याने दिसून आली. त्यामुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव १६२ रुपयांनी वाढले असून प्रति १० ग्रॅमला सोन्याचा दर ३९१८२ रुपये झाला आहे. 

एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार मंगळवारी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३९०२० रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोन्यासोबत चांदीच्या भावातही ९५ रुपये प्रतिकिलो वाढ झाली आहे. त्यामुळे चांदीचा दर ४८,८१५ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला आहे.  काल बाजार बंद झाला तेव्हा चांदीचा दर प्रति किलो ४८,७२० रुपये होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे परामर्श प्रमुख देवर्ष वकील यांनी सांगितले की, 'रुपयाचे मूल्य कमी झाल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीचे वाढलेले दर पाहता दिल्लीमध्ये सोन्याची हाजिर किंमत मंगळवारी चढा भावाने बंद झाली. 

तसेच आगामी काळात येणारे सण लक्षात घेतला ही मागणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता वकील यांनी व्यक्त केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा दरात वाढ दिसून आली. १५३१.५२ डॉलर प्रति औंसवर सोन्याच्या किंमती बंद झाल्या. तर चांदीमध्ये किरकोळ वाढ दिसून आली आणि चांदीच्या किंमती प्रति औंस १८.६२ डॉलर प्रति औंस झाली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी