सोन्याच्या दरात आज दुसऱ्या दिवशी मोठा बदल, जाणून घ्या आजचे भाव 

काम-धंदा
Updated Sep 24, 2019 | 18:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

सोने आणि चांदीच्या दरात आज दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली.  सणासुदीच्या तोंडावर आलेली मागणी आणि आंतराराष्ट्रीय कारणांमुळे सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसून आली. जाणून घ्या आज काय आहे सोन्याचे दर 

gold price gain rs 330 silver big gain rs 730 delhi sarafa 24 sept news in marathi
सोन्याच्या दरात आज दुसऱ्या दिवशी मोठा बदल  |  फोटो सौजन्य: Thinkstock

थोडं पण कामाचं

  •  सोने आणि चांदीच्या दरात आज दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली.
  • दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढला.
  • चांदीच्या दरात ७३० रुपयांची तेजी दिसून आली. 

नवी दिल्ली :  सोने आणि चांदीच्या दरात आज दुसऱ्या दिवशी तेजी दिसून आली.   आज दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढला. तर चांदीच्या दरात ७३० रुपयांची तेजी दिसून आली. 

आंतरराष्ट्रीय संकेत आणि सणासुदीच्या तोंडावर मागणी वाढल्याने सोने आणि चांदीच्या दरात वाढ दिसून आली. दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव ३३० रुपयांनी वाढून ३९०२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. 

चांदीचा दर मंगळवारी ७३० रुपयांनी वाढून प्रतिकिलो ४८७२० रुपये झाला. सोमवारी चांदीचा दर हा ४७९९० रुपये प्रतिकिलो बंद झाला होता. आंतरराष्ट्रीय सत्रावर सोने आणि चांदीचे भावात तेजी दिसून येत आहे. अमेरिकेत मॅन्युफॅक्चरिंग पीएमआयच्या आकडे चांगली आल्यानंतर चांदीमध्ये तेजी दिसून आली. 

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोन्याचा भाव १५२२ डॉलर प्रति औंस झाला आहे. तर चांदीच दर १८.५ डॉलर प्रति औंस सुरू आहे. काही दिवसांत नवरात्रीचा सण सुरू होणार आहे. त्यामुळे बाजारात हळहळू मागणी यायला सुरूवात झाली आहे. 

आज MCX वर सोने आणि चांदीच्या दर कमकुवत दिसले. MCXवर चांदीचा भाव ८१ रुपयांनी कमी होऊन ४८०३२ रुपये आणि सोन्याचा भाव ६२ रुपयांनी कमी होऊन ३७८६२ रुपये ट्रेड करण्यात येत होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी