Gold Price: गेल्या महिन्यात इतके स्वस्त झाले सोने, चांदी इतक्या हजारांची घट 

भारतातील स्थानिक बाजारात  सोने-चांदीत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. ही गेल्या काही महिन्यापासून सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे.

gold price gold fell sharply this week silver
Gold Price: गेल्या महिन्यात इतके स्वस्त झाले सोने  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • भारतातील स्थानिक बाजारात  सोने-चांदीत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली.
  • या आठवड्याच्या पहिला  व्यापारी दिवस सोमवार २१ सप्टेंबरला एमसीएक्सवर ऑक्टोबरचा वायदा सोने ५१ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर खुले झाले.
  • ६ ऑगस्टला ऑक्टोबरचा वायदा सोन्याचा भाव ५५ हजार ८४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता.

नवी दिल्ली :  भारतातील स्थानिक बाजारात  सोने-चांदीत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळाली. ही गेल्या काही महिन्यापासून सर्वात मोठी साप्ताहिक घट आहे.  तसेच जागतिक बाजारात सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात मार्चनंतर सर्वात मोठी साप्ताहिक घट नोंदविण्यात आली. गेल्या आठव्यात सोन्यात ४.६ टक्के आणि चांदी १५ टक्के घट पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात अखेरच्या व्यापारी सत्रात शुक्रवारी दोन्ही धातूंच्या किंमती घटीसह बंद झाल्या. 

 एमसीएक्स एक्सचेंजवर पाच ऑक्टोबरची २०२० च्या सोन्याची वायदा किंमत Gold Futures Price) आठवड्याच्या अखेरच्या कारोबारी दिवस असलेल्या शुक्रवारी २४५ रुपयांच्या घटीसह ४९ हजार ६५९ रुपये प्रती १० ग्रॅमवर बंद झाली . या शिवाय डिसेंबरच्या वायदे सोन्याची किंमत शुक्रवार घटीसह ४९ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली. आता जाणून घेऊ या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत किती बदल झाला. 

सोने गेल्या आठवड्यात २ हजार २१० रुपयांनी स्वस्त 

सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात घट झाली. या आठवड्याच्या पहिला  व्यापारी दिवस सोमवार २१ सप्टेंबरला एमसीएक्सवर ऑक्टोबरचा वायदा सोने ५१ हजार ६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर खुले झाले. यापूर्वी पहिल्या सत्रात ५१ हजार ७१५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले. याप्रमाणे या सोन्याची किंमत या आठवड्यात २०५६ रुपये प्रति १० ग्रॅमने स्वस्त झाले होते.  या शिवाय डिसेंबर वायदा सोने किंमत गेल्या आठवड्याचा तुलनेत २२१० रुपये प्रति १० ग्रॅमने घटले आहे. 

चांदी गेल्या आठवड्यात ८ हजार ८५० रुपयांनी स्वस्त

एमसीएक्सवर डिसेंबरच्या वायदा चांदीच्या (Silver Price)  किंमतीत  गेल्या आठवड्याचा अखेरचा व्यापारी दिवस असलेल्या शुक्रवारी एमसीएक्सवर ६०२ रुपये घटीसह ६९ हजार ०२७ रुपये प्रती किलोग्रॅमवर बंद झाली. या चांदीचा भाव आठवड्याच्या पहिल्या कारभारी दिवस सोमवार २१ सप्टेंबरला एमसीएक्सवर ६७ हजार ८८८ रुपये प्रति किलोग्रॅमवर खुला झाला होता. या पूर्वी गेल्या सत्रात ६७ हजार ८७७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाला. या प्रमाणे चांदीचा भावात गेल्या आठवड्यात ८८५० रूपये प्रति किलो ग्रॅमच्या किरकोळ घट झाली. 

गेल्या महिन्याच्या भावाशी सोन्या-चांदीची तुलना 

आता आपण जाणून घेऊ या गेल्या महिन्याच्या तुलनेत सोन्या-चांदीचे सध्याचे भाव कसे आहेत. ६ ऑगस्टला ऑक्टोबरचा वायदा सोन्याचा भाव ५५ हजार ८४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत ६ हजार १८६ रुपये प्रति १० ग्रॅमची घट आली आहे. तर दुसरीकडे चांदीबाबत बोलायचे झाले तर १० ऑगस्टला डिसेंबरचा चांदीचा वायदा भाव ७८ हजार २५६ रुपये प्रति किलो होता. त्यात आता १९ हजार २२९ रुपये प्रति किलो ग्रॅमची घट आली आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी