सोने, चांदी सहा महिन्यांत झाले स्वस्त

gold price gold rate breaks more than rs 10000 in six months silver price also falls वायदे बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली

gold price gold rate breaks more than rs 10000 in six months silver price also falls
सोने, चांदी सहा महिन्यांत झाले स्वस्त 

थोडं पण कामाचं

  • सोने, चांदी सहा महिन्यांत झाले स्वस्त
  • वायदे बाजारात सोने आणि चांदीच्या किंमतीत घट
  • राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परििणाम

नवी दिल्ली: सोने आणि चांदी हे दोन्ही मौल्यवान धातू सहा महिन्यांत स्वस्त झाले आहेत. वायदे बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीत घट झाली आहे. (gold price gold rate breaks more than rs 10000 in six months silver price also falls)

सोन्याची वायदे बाजारातील किंमत ७ ऑगस्ट २०२० रोजी एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ५७ हजार १०० रुपये एवढी झाली होती. तर सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी वायदे बाजारातील सोन्याची किंमत ४६ हजार १९७ रुपयांवर पोहोचली. याच पद्धतीने चांदीची वायदे बाजारातील किंमत १० ऑगस्ट २०२० रोजी ७९ हजार १४७ रुपये होती. सहा महिन्यांत वायदे बाजारात चांदीची किंमत किलोमागे १० हजार १३५ रुपयांनी घसरली.

एमसीएक्स एक्सचेंजमध्ये (The Multi Commodity Exchange of India Limited - MCX) सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी वायदे बाजारातील ५ एप्रिल २०२१च्या सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ४६ हजार १९७ रुपये झाली. याचा अर्थ सहा महिन्यांत वायदे बाजारात सोने तोळ्याला १० हजार ९०३ रुपये एवढे स्वस्त झाले. याआधी मागच्या आठवड्यात वायदे बाजारात सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ४७ हजार ४३६ रुपयांवर खुली झाली. त्याआधी मागच्या आठवड्यात वायदेबादारामध्ये सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ४७ हजार ३१८ रुपयांवर बंद झाली होती. आठवड्याभरात सोन्याच्या वायदे बाजारातील किंमतीत ११२१ रुपयांची घसरण झाली.

चांदीची वायदे बाजारातील किंमत कमी झाली. शुक्रवारी १९ फेब्रुवारी २०२१ रोजी वायदे बाजारातील पाच मार्च २०२१च्या चांदीची किंमत किलोमागे ६९ हजार १२ रुपयांवर बंद झाली. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये (The Multi Commodity Exchange of India Limited - MCX) आठवड्याभरात चांदीच्या किंमतीत ५१८ रुपयांची वाढ दिसली. याआधी सोमवारी १५ फेब्रुवारी रोजी वायदे बाजारातील ५ मार्च २०२१च्या चांदीची किंमत किलोमागे ६९ हजार ३०० रुपयांवर खुली झाली. याआधी मागच्या आठवड्याच्या शुक्रवारी वायदे बाजारातील चांदीची किंमत किलोमागे ६९ हजार ११७ रुपये वर बंद झाली. आठवड्याभरात चांदीच्या दरात किलोमागे १०५ रुपयांची घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय करन्सी एक्सचेंजमध्ये डॉलर सुस्थितीत असल्याचे चित्र आहे. निवडणुकांनंतरची अनिश्चितता संपून अमेरिकेत नव्या सरकारचा कारभार सुरळीत सुरू आहे. शिवाय भारत सरकारने मौल्यवान धातूंवरील कर कमी केले आहेत. यामुळे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या वायदे बाजारातील दरांमध्ये घसरण होत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मौल्यवान धातूंवर जीएसटी आणि इतर कर लागू होतात. या करांमुळे मौल्यवान धातूंची किंमत आणखी वाढते. भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंचा उपयोग अलंकार (आभूषणे) तयार करण्यासाठी, गुंतवणूक करण्यासाठी, अध्यात्मिक कारणांसाठी, धार्मिक कारणांसाठी आणि वैद्यकीय कारणांसाठी होतो. भारतीय संस्कृतीत सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना महत्त्व आहे. भारतात सोने आणि चांदी हे मौल्यवान धातू प्रतिष्ठेचे प्रतिक समजले जातात. भारतामध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना मोठी मागणी आहे. शुभकार्याच्या निमित्ताने भारतात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंची खरेदी केली जाते. याच कारणामुळे भारतीय नागरिकांच्या दृष्टीने सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती आणि दरातील चढउतार हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. 

गुंतवणुकीपेक्षा भारतीयांचा कल अन्य कारणांसाठी सोने आणि चांदी यांच्या खरेदीकडे जास्त आहे. भारतीय मानसिकतेची जाणीव असलेल्या केंद्र सरकारने सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंवरील कस्टम ड्युटीत कपात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयामुळे सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती कमी होऊ लागल्या आहेत. या घडामोडींचा परिणाम वायदे बाजारातील सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांवर दिसत आहे.

वायदे बाजार म्हणजे काय?

वायदे बाजार म्हणजे भविष्यात होणार असलेल्या व्यवहारासाठी आज करार करणे. यात खरेदीदार आणि विक्रेता त्यांना मान्य असलेल्या मालमत्तेची भविष्यातील किंमत निश्चित करुन त्याआधारे करार करतात. मागील काही महिन्यांतील घडामोडींमुळे भारतात वायदे बाजारातील सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये सहा महिन्यांत घट झाल्याचे आढळले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी