Gold-Silver Rate Today, 19 July 2022: सोन्याच्या भावात चढउतार, गुंतवणुकदारांमध्ये सोन्याबद्दल नकारात्मक कल, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 19 July 2022: आज भारतातील सोन्याचे भाव (Gold Price) घसरले आहेत. कारण जागतिक स्तरावर सोन्याच्या भावावर मजबूत अमेरिकन डॉलरचा परिणाम होतो आहे. अमेरिकन डॉलरच्या ताकदीने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर म्हणजे एमसीएक्सवर (MCX) ऑगस्टसाठीचे सोने फ्युचर्स 92 रुपये किंवा 0.2 टक्क्यांनी घसरून 50,269 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आले होते.

Gold and Silver Rate Today: Gold price unstable
Gold and Silver Rate Today: सोन्याचे भाव अस्थिर 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात जागतिक स्तरावर अस्थिरता
  • गुंतवणुकदार आणि व्यापारी सोन्याच्या भावासंदर्भात सावध
  • अमेरिकन बॉंडचा वाढलेला परतावा आणि अमेरिकन डॉलरची मजबूतीचा सोन्याच्या भावावर परिणाम

Gold and Silver Rate Today, 19 July 2022 : नवी दिल्ली : आज भारतातील सोन्याचे भाव (Gold Price) घसरले आहेत. कारण जागतिक स्तरावर सोन्याच्या भावावर मजबूत अमेरिकन डॉलरचा परिणाम होतो आहे. अमेरिकन डॉलरच्या ताकदीने सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर म्हणजे एमसीएक्सवर (MCX) ऑगस्टसाठीचे सोने फ्युचर्स 92 रुपये किंवा 0.2 टक्क्यांनी घसरून 50,269 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आले होते. तर चांदीचे सप्टेंबर फ्युचर्स 560 रुपये किंवा 1 टक्क्यांनी घसरून 55,532 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत होते. (Gold price is unstable amid strong dollar & rising bond yields)

अधिक वाचा : Cryptocurrency Price : क्रिप्टोकरन्सीची चमक परतली, बिटकॉइन आणि इथेरियमच्या किंमतीत झाली वाढ

मजबूत डॉलरचा परिणाम

जागतिक स्तरावर, अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. त्याचा परिणाम होतो सोन्याच्या भावात घसरण झाली आहे, तर बॉंडचा परतावादेखील वाढला आहे. गुंतवणुकदार फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात आणखी वाढीच्या संकेतांची वाट पाहत आहेत. स्पॉट गोल्ड 0.2% घसरून 1,706.25 डॉलर प्रति औंस झाले. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3% घसरून 1,705.30 डॉलरवर आले.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात 0.75% ते 1% वाढ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर डॉलर आंतरराष्ट्रीय पातळीवर ऐतिहासिक उच्चांकीवर पोचला आहे आणि अमेरिकेतील बॉंडच्या परताव्यातदेखील वाढ झाली आहे. या तिन्ही घटकांचा परिणाम होत सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याबद्दल सध्या नकारात्मक कल आहे. व्यापारी आणि गुंतवणुकदारांमध्‍ये सोन्याचे आकर्षण कमी होत कालच्‍या सोन्याच्‍या भावाच्या चढ-उतारात आक्रमकपणे विक्री झाली.

अधिक वाचा : GST rate hike : जीएसटी दरात वाढ झाल्याने, काय महाग झाले आणि काय स्वस्त...पाहा यादी

अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे लक्ष

व्याजदरात 100 bps दर वाढीची शक्यता थोडी कमी झाली आहे. कारण अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या आगामी बैठकीत दोन प्रमुख Fed अधिकार्‍यांनी दर 75 bps ने वाढवण्याचे समर्थन केले आहे. जाणकारांच्या मते ईसीबीच्या बैठकीपूर्वी सोन्याचा भाव  1700 डॉलर ते 1730 डॉलर प्रति औंस स्तरांदरम्यान पोचेल. MCX वर, सोन्याचा भाव 50,000 ते 50,900 रुपये प्रति 10 ग्राम स्तरांदरम्यान असण्याची शक्यता आहे. वरच्या पातळीवर सोने 50,700 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकते तर खालच्या स्तरावर सोने  50,200 रुपयांच्या पातळीवर राहण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांनी सोन्याच्या गुंतवणुकदारांना 21 जुलै रोजी रशियावर लक्ष ठेवण्यास सांगितले आणि रशिया नॉर्ड स्ट्रीम 1 पाइपलाइनद्वारे गॅस प्रवाह सेवा पुन्हा सुरू करते की नाही हे पाहण्यास सांगितले.

अधिक वाचा : EPFO Update: पीएफ खातेधारकांना मिळणार अधिक रक्कम! ईपीएफओ घेणार आहे मोठा निर्णय

अमेरिकेत सध्या अनेक मोठ्या आर्थिक घडामोडी घडत आहेत. एकीकडे डॉलरने 20 वर्षांचा उच्चांक गाठला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव वाढत आहे. दुसरीकडे, महागाई देखील 41 वर्षांच्या शिखरावर असून गुंतवणूकदार सोन्यापासून दूर गेले आहेत. याशिवाय व्याजदरात सातत्याने वाढ होत असल्याने गुंतवणुकदारांना ठेवींवर चांगला परतावा मिळू लागला आहे, त्यामुळे सोन्यासारख्या गुंतवणूक प्रकारापासून गुंतवणुकदार अंतर राखून आहेत.

डॉलरचे मूल्य 20 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोचले आहे. अमेरिकेतील 10-वर्षांसाठीचा ट्रेझरी परतावा शुक्रवारी एक आठवड्याच्या उच्चांकीवर पोचला आहे.  युरोपियन युनियनमधील महागाई, मंदीची भीती आणि ऊर्जा संकट यामुळे युरो गेल्या दोन दशकांतील नीचांकी पातळीवर आला आहे. गुंतवणुकदार या आठवड्यात जाहीर होणाऱ्या जूनसाठीच्या युनायटेड स्टेट्सच्या ग्राहक किंमत निर्देशांकाचीच री ओढतील अशी चिन्हे आहेत. वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार, जूनमध्ये ग्राहक किंमतींची आकडेवारी 40 वर्षांच्या उच्चांकावर जाईल, असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.  अमेरिकन बेंचमार्क ट्रेझरी परताव्यातदेखील 3 टक्के वाढ झाल्यामुळे देखील सोने-चांदीच्या भावांवर दबाव आला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी