Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला ५ वर्षांचा उच्चांक

काम-धंदा
Updated Jun 20, 2019 | 17:52 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

Gold Price Today: सोन्याच्या दरात आज मोठे वाढ झाले आहेत. सोन्याच्या दरांनी गेल्या पाच वर्षातील उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या सोन्याच्या तेजीमागे काय आहे कारण...

gold rate
सोन्याचे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर नव्या उच्चांकांवर पोहोचले आहेत. अमेरिकेच्या केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हने संकेत दिले आहेत की व्याजदरात कपात होऊ शकते. याच कारणामुळे डॉलरचा दर आणि यूएस ट्रेजरी यील्ड खाली आले आहेत. सोन्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर १३८० डॉलर प्रति औंस झाले आहेत. हे भाव गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक आहेत. याआधी मार्च २०१४मध्ये सोन्याच्या दरांनी १३८३.८ डॉलर हा उच्चांक गाठला होता. तर चांदीचे दर १५.२६ डॉलर प्रति औंस झाले आहेत. केडिया कमोडिटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी एमसीएक्सवर सोन्याचे दर ३३८५०वरून ३३९८० रूपये प्रति तोळा केले आहेत. 

फेडरल रिझर्व्हने संकेत दिलेत की व्याजदरात पुढील महिन्यात कपात होऊ शकते. आज एमसीएक्सवर सोन्याचे दर ७२० रूपयांच्या वाढीसह ३३७९० रूपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले. तर चांदीचे भाव ५७७ रूपयांच्या तेजीसह ३७८८१ रूपयांवर पोहोचले. इंडिया निवेशचे डायरेक्टर मनोज जैन यांच्या मते लवकरच सोन्याचा दर १४०० डॉलर स्तरावर पोहोचू शकतो. एंजेल ब्रोकिंगमध्ये डेप्युटी वीपी अनुज गुरव सोन्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर दर १४२०वरून १४४० पर्यंत जाऊ शकतात. 

कार्वी स्टॉक ब्रोकिंगमध्ये रिसर्च हेड रवी सिंह यांनी सांगितले दक्षिण इराणमध्ये एका रॉकेट हल्ल्याने अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्याच्यामके डॉलर इंडेक्स आठवड्याभराच्या नीचांकांवर आहे. १० वर्षांची अमेरिकन ट्रेझरी यील्डही गेल्या दोन वर्षातील सर्वात नीचांक स्तरावर आहे. आज दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे दर २८० रूपयांनी वाढून ते ३४ हजार रूपयांवर पोहोचले तर चांदीचे दर ७१० रूपयांनी वाढून ते ३९०६० रूपये प्रति किलोवर पोहोचले. 

दिल्लीच्या सराफा बाजारात सोने ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेचे सोन्याच्या दरात प्रत्येकी २८० रूपयांची वाढ होत ते अनुक्रमे ३४,२०२ आणि ३३,८५० रूपये प्रति तोळा पोहोचले. ८ ग्रॅम गिन्नीचे दर २६,८०० रूपयांवर स्थिर राहिले. 

चांदीचे दर ७१० रूपयांच्या तेजीसह ३९,०६० रूपये प्रतिकिलोग्रॅमवर पोहोचले तर साप्ताहिक डिलीव्हरीच्या चांदीचे दर  ७४२ रूपयांच्या तेजीसह ३८,०४४ रूपये प्रती किलोग्रॅमवर पोहोचले.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Gold Price Today: सोन्याच्या दराने गाठला ५ वर्षांचा उच्चांक Description: Gold Price Today: सोन्याच्या दरात आज मोठे वाढ झाले आहेत. सोन्याच्या दरांनी गेल्या पाच वर्षातील उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या सोन्याच्या तेजीमागे काय आहे कारण...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola