Gold-Silver Rate Today, 22 September 2022: सोने नीचांकीवर...अमेरिकेत व्याजदर वाढ, पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 22 September 2022: सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ (Fed rate hike) केली आहे. अमेरिकेतील व्याजदर 75 बेसिस पॉइंट्सने वाढले आहेत. त्यामुळे सोन्याचा भाव सात महिन्यांच्या नीचांकीवर पोचला आहे. त्यामुळे डॉलर मजबूत झाला असून सोने-चांदीच्या भावात घसरण झाली आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण झाली
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केली
  • रुपया कमकुवत तर डॉलर मजबूत झाला

Gold and Silver Rate Today, 22 September 2022: नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price) आज घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या भावात (Silver Price)घसरण झाली आहे. त्याचा परिणाम भारतातील सोने आणि चांदीच्या भावावर देखील होत देशांतर्गत बाजारात घसरण झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ (Fed rate hike) केली आहे. अमेरिकेतील व्याजदर 75 बेसिस पॉइंट्सने वाढले आहेत. फेडरल रिझर्व्हकडून भविष्यात आणखी व्याजदरवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे डॉलर मजबूत झाला असून सोने-चांदीच्या भावात घसरण ते सोन्याचा भाव सात महिन्यांच्या नीचांकीवर पोचला आहे. डॉलरचा निर्देशांक दोन दशकांच्या नवीन उच्चांकीजवळ पोचला आहे. त्यामुळे इतर चलनांमध्ये खरेदी करणाऱ्यांसाठी सोने तुलनेने महाग झाले आहे. (Gold price reached 7 months low as Fed hike the interest rate)

अधिक वाचा : Navratri Fasting: नवरात्रीत करतात 9 दिवसांचा उपवास...पाहा काय असतात आरोग्यासाठी उपवासाचे फायदे

सोन्याचा ताजा भाव

मल्टीकमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.25% खाली येत 49,321 रुपयांच्या 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आले होते. तर चांदी 0.4% घसरून 57,059 रुपये प्रति किलो झाली होती. जागतिक बाजारात, सोन्याच्या स्पॉट किंमती 1% घसरून 1,656.97 डॉलर प्रति औंसवर आल्या आहेत. अमेरिकेत व्याजदरात वाढ झाल्याने अमेरिकन डॉलर मजबूत झाला आहे. त्याचबरोबर अमेरिकन बॉंडचा परतावादेखील वाढला आहे. अमेरिकन फेडच्या दरांचा बारकाईने मागोवा घेणाऱ्या यूएस ट्रेझरीचे दोन वर्षांचे उत्पन्न  2007 नंतर 4% पेक्षा जास्त वाढले आहे.

सोन्याकडे महागाईविरोधातील सुरक्षित मालमत्ता साधन म्हणून पाहिले जाते. परंतु महागाई नियंत्रित करण्यासाठी करण्यात आलेल्या व्याजदर वाढीमुळे शून्य-उत्पन्न सराफा ठेवण्याची संधी खर्च वाढतो. स्पॉट सिल्व्हर 1.7% घसरून 19.26 डॉलर प्रति औंस तर प्लॅटिनम 1.1% घसरून 897.92 डॉलरवर आले.

अधिक वाचा : Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी पालिकेकडून शिवसेनेच्या दोन्ही गटांना परवानगी नाही, शिवसेनेच्या ठाकरे गटाची उच्च न्यायालयात धाव

डॉलर झाला मजबूत

अमेरिकेच्या मध्यवर्ती बँकेने या वर्षी आणखी 0.75% वाढ होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे आणि 2024 पर्यंत व्याजदरात कोणतीही कपात न होण्याच्या संकेतामुळे अमेरिकन डॉलर निर्देशांकाने 2002 च्या नंतरच्या नव्या उच्चांकावर झेप घेतली आहे. यूएस डॉलरला सुरक्षित आश्रय खरेदीमुळेही पाठिंबा मिळतो. त्याचबरोबर इतर मध्यवर्ती बॅंकांच्या चलनविषयक धोरणात कोणताही मोठा बदल झालेला नाही. त्यामुळे डॉलर मजबूत झाला आहे. दोन वर्षांचे यूएस ट्रेझरी उत्पन्न देखील 4 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहे.

अधिक वाचा : Mumbai: 20 वर्षीय तरुणीवर आजोबा आणि काकांनी केला बलात्कार, 12 वर्षांपासून सुरू होता धक्कादायक प्रकार

गुंतवणुकदार सावध

सोन्याच्या भावात घसरण झालेली असूनही गुंतवणुकदारांनी सोन्यामधील गुंतवणुकीसंदर्भात सावध भूमिका घेतली आहे. जगातील सर्वात मोठा सोन्याचा आधार असलेला एक्सचेंज-ट्रेडेड फंड असलेल्या SPDR गोल्ड ट्रस्टचे होल्डिंग्स, मंगळवारी 953.32 टनांवरून बुधवारी 0.12% घसरून 952.16 टन झाला. आगामी काळातदेखील सोने आणि चांदी अस्थिर राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गुंतवणुकदार सोन्यासंदर्भात सावध पावले उचलत आहेत. अमेरिकेतील व्याजदरात दबाव सराफा बाजारावर आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी