Gold and Silver Rate Today, 09 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याचे भाव (Gold Price) स्थिर आहेत. 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 51,870 रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव (Silver Price) 57,400 रुपयांच्या पातळीवर आहे. कालपासून सोन्याचे भाव स्थिर आहेत. राज्य कर, उत्पादन शुल्क आणि मेकिंग चार्जेस यासारख्या कारणांमुळे सोन्याचा भाव दररोज बदलत असतो. गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, मुंबई आणि कोलकाता येथे 22 कॅरेटचे 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,550 रुपये आहे. तर नवी दिल्लीत सोन्याचा भाव 47,700 रुपयांवर आहे. चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 48,500 रुपये आहे. (Gold price remains flat today, check latest rates)
अधिक वाचा : Taapsee Pannu Viral Video: पापाराझीसोबत कचाकचा भांडली तापसी पन्नू; नंतर हात जोडून म्हणाली, ''माझ्याशी...''
24 कॅरेट सोन्याचा दर पाहिला तर कोलकाता आणि मुंबईत 10 ग्रॅम सोन्याचा भाव 51,870 रुपयांच्या पातळीवर आहे. चेन्नईमध्ये 52,900 रुपयांना 24-कॅरेट शुद्धतेची समान मात्रा खरेदी केली जात आहे. नवी दिल्लीत सोन्याचा भाव 52,030 रुपये आहे.
पुणे आणि अहमदाबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव अनुक्रमे 47,580 आणि 47,600 रुपयांना मिळत आहे. 24-कॅरेट सोन्याचा भाव पुण्यात 51,900 रुपये आणि अहमदाबादमध्ये 51,930 रुपये आहे.
केरळ, विजयवाडा आणि हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,550 रुपयांना मिळत आहे. म्हैसूर, बेंगळुरू आणि मंगळुरूमध्ये हीच रक्कम 47,600 रुपयांना मिळू शकते. केरळ, विजयवाडा आणि हैदराबादमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,870 रुपये आहे. बेंगळुरू, म्हैसूर आणि मंगळुरूमध्ये 51,930 रुपयांच्या पातळीवर 24 कॅरेट सोन्याचा भाव आहे.
अधिक वाचा : Maharashtra Cabinet Expansion Live: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा सुरु
नागपूर आणि चंदीगडमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची खरेदी अनुक्रमे 47,580 आणि 47,700 रुपयांना होत आहे. नागपुरात, 24-कॅरेट शुद्धतेच्या याच रकमेची किंमत 51,900 रुपये आहे, तर चंदीगडमध्ये 52,030 रुपयांना विकली जात आहे.
कोईम्बतूर आणि नाशिकमध्ये 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची खरेदी 48,500 आणि 47,580 रुपयांना होत आहे. 24-कॅरेट शुद्धतेचे हेच प्रमाण कोईम्बतूरमध्ये 52,900 रुपयांना विकले जात आहे. नाशिकमध्ये मौल्यवान धातूची किरकोळ विक्री 51,900 रुपयांना होत आहे.
अलीकडील मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सच्या (MCX)आकडेवारीनुसार सोन्याचे फ्युचर्स, जे या वर्षी 5 ऑक्टोबर रोजी मॅच्युअर्ड होतील, 0.75 टक्क्यांनी वाढून 52,261.00 रुपये झाले. 5 सप्टेंबर 2022 रोजी मॅच्युअर्ड होणार्या चांदीच्या फ्युचर्समध्येही वाढ दिसून आली आणि 2.94 टक्क्यांच्या वाढीनंतर ते 59,050.00 रुपयांवर पोचले.
अमेरिकेतील रोजगारासंदर्भात मागील आठवड्यात सकारात्मक ठोस अहवाल आल्यानंतर अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून (US Federal Reserve)आक्रमकपणे व्याजदर वाढीची शक्यता वाढवली आहे. त्यामुळे सोमवारी सोन्याचे भाव स्थिर झाले तर डॉलरचे मूल्य वाढले आहे आणि अमेरिकन बॉंडचा परतावा वाढला आहे. जुलैमध्ये अमेरिकेतील नोकऱ्यांच्या वाढीला अनपेक्षितपणे वेग आला. रोजगाराची पातळी त्याच्या कोरोना महामारीच्या आधीच्या पातळीपेक्षा वर आली आणि अर्थव्यवस्थेतील मंदीची भीती कमी झाली.