Gold-Silver Rate Today, 04 August 2022: सोन्याच्या भावात अस्थिरता, चढउतार सुरूच...पाहा ताजा भाव

Gold and Silver Rate Today, 04 August 2022: भारतीय सराफा बाजारात आजही सोन्याच्या भावात (Gold Price) चढ-उतार होत आहेत. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव अस्थिर आहेत. जर तुम्ही खूप दिवसांपासून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. गुरुवारीही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे.

Gold and Silver Rate Today: Gold price drops
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात घसरण 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावातील चढउतार सुरूच आहेत
  • गुंतवणुकदारांची सावध भूमिका
  • सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या धोरणाकडे

Gold and Silver Rate Today, 04 August 2022: नवी दिल्ली:  भारतीय सराफा बाजारात आजही सोन्याच्या भावात (Gold Price) चढ-उतार होत आहेत. आठवड्याच्या चौथ्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी, भारतीय सराफा बाजारात सोन्याचे भाव अस्थिर आहेत. जर तुम्ही खूप दिवसांपासून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी चांगली संधी असणार आहे. कारण गुरुवारीही सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळत आहे. याशिवाय सोने त्याच्या सर्वकालीन उच्चांकीपेक्षा  खूपच स्वस्त दरात उपलब्ध आहे. (Gold price remains unstable amid global factors)

अधिक वाचा : Eknath shinde vs shiv sena Supreme Court: शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत निकालापर्यंत कोणताही निर्णय घेऊ नका: सुप्रीम कोर्ट

सोन्याचा ताजा भाव

दिल्लीतील सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. जरी ही घट अगदी किरकोळ आहे. दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी 22 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 47,140 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. आज सोन्याच्या दरात प्रति दहा ग्रॅम 10 रुपयांनी किरकोळ घट झाली आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव 47,150 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

24 कॅरेट सोन्याचा भाव

गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मात्र, 24 कॅरेट सोन्याच्या दरात थोडीशी घसरण झाली आहे. गुरुवारी 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम 51,430 रुपये होता. यादरम्यान, त्याच्या किमतीतही 10 रुपये प्रति दहा ग्रॅमची घसरण झाली आहे. याआधी, बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव 51,440 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

अधिक वाचा : उद्या होणार शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार?असं असू शकतं मंत्रिमंडळ, कोणाकडे जाणार वित्त खातं

विक्रमी उच्च दरापेक्षा सोने किती स्वस्त 

आजच्या 24 कॅरेट सोन्याच्या किमतीवर नजर टाकली तर, सोनं त्याच्या सर्वकालीन विक्रमी किमतीपेक्षा खूपच स्वस्त विकलं जात आहे. आम्ही तुम्हाला सांगूया की ऑगस्ट 2020 मध्ये 24 कॅरेट सोन्याने 55,400 रुपये प्रति दहा ग्रॅम हा आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता. आजच्या दराची या दराशी तुलना केल्यास आज सोन्याच्या भावात 3,970 रुपयांची घसरण झाली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात, गुरुवारी सोन्याचा भाव स्थिर होत्या, ज्याला यूएस ट्रेझरी उत्पन्नातील पुलबॅकमुळे पाठिंबा मिळाला आणि सावध गुंतवणूकदारांनी या आठवड्यात यूएस नॉन-फार्म पेरोल अहवालाची वाट पाहिली. सर्वांचेच लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणाकडे आहे. स्पॉट गोल्ड, प्रति औंस 1,767.39 डॉलरवर टिकून आहे. अमेरिकन सोन्याचे वायदे 0.4% वाढून 1,783.90 डॉलरवर पोचले, असे वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

अधिक वाचा : Commonwealth Games 2022 : 109 किलो वजन गटातील गुरदीप सिंगनं 390 किलो वजन उचलत भारतासाठी आणलं कांस्य पदक

देशाच्या विविध शहरातील 22 कॅरेट सोन्याचा भाव (GST, TCS आणि इतर शुल्क वगळता) पुढीलप्रमाणे-

चेन्नई : 48,250 रु

मुंबई : 47,500 रु

दिल्ली : 47,650 रु

कोलकाता: 47,500 रु

बंगळुरू : 47,550 रु

हैदराबाद : 47,500 रु

केरळ : 47,500 रु

अहमदाबाद : 47,550 रु

जयपूर : 47,240 रु

लखनौ: 47,650 रु.

पाटणा : 47,530 रु.

चंदीगड : 47,650 रु

भुवनेश्वर : 47,500 रु

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी