Gold-Silver Rate Today, 30 July 2022: सोन्याला पुन्हा सुगीचे दिवस...अमेरिकेचा जीडीपी घसरल्याचा परिणाम, पाहा खरेदी करण्याची योग्य वेळ आहे का?

Gold and Silver Rate Today, 30 July 2022: अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) व्याजदर वाढीबाबतची शक्यता आणि सलग दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीमध्ये (GDP) घट झाल्यामुळे सोन्याचा भाव (Gold Price) दर सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीत राहिला. सोन्याचा ऑगस्टचा भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट शुक्रवारी 126 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 51,430 रुपयांच्या स्तरावर संपला. तर स्पॉट फोल्ड किंमत 0.52 टक्क्यांनी वाढून 1765 डॉलर प्रति औंस पातळीवर होती.

Gold and Silver Rate Today: Gold Price rises
Gold and Silver Rate Today: सोन्याच्या भावात पुन्हा तेजी 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावातील तेजी परतली
  • अमेरिकन अर्थव्यवस्थेतील घसरण, डॉलरच्या मूल्यात झालेली घसरण याचा परिणाम
  • अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे व्याजदर वाढीचे धोरण मवाळ झाल्याचाही सोन्याचा मोठा फायदा

Gold and Silver Rate Today, 30 July 2022: नवी दिल्ली : अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Fed) व्याजदर वाढीबाबतची शक्यता आणि सलग दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेच्या जीडीपीमध्ये (GDP) घट झाल्यामुळे सोन्याचा भाव (Gold Price) दर सलग दुसऱ्या आठवड्यात तेजीत राहिला. सोन्याचा ऑगस्टचा भविष्यातील कॉन्ट्रॅक्ट शुक्रवारी 126 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढून 51,430 रुपयांच्या स्तरावर संपला. तर स्पॉट फोल्ड किंमत 0.52 टक्क्यांनी वाढून 1765 डॉलर प्रति औंस पातळीवर होती. अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे कमी आक्रमक भूमिका, अमेरिकेची ढासळलेली अर्थव्यवस्था, उच्चांकीवरून खाली आलेला डॉलर या कारणांमुळे सोन्याला पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत. आगामी काळात सोन्याच्या भावात तेजी राहण्याची चिन्हे आहेत. (Gold price rises amid mild tone of the US Fed on interest rate hike and fall in the US GDP data)

अधिक वाचा : Bhagat Singh Koshyari: 'राज्यपाल कोश्यारी अजगरासारखे सुस्त पडलेले असतात...' उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली 'ती' सल

तज्ज्ञांना काय वाटते

कमोडिटी मार्केट तज्ज्ञांच्या मते, अमेरिकन फेडरल रिझर्व्हची व्याजदर वाढीबाबतची  तीव्र ते कमी तीव्र भूमिका आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील कमकुवतपणा दाखवणारी आकडेवारी सलग दुसऱ्या तिमाहीत राहिल्याने डॉलर इंडेक्स त्याच्या 20 वर्षांच्या उच्चांकीवरून म्हणजे 109.30 रुपयांच्या पातळीवरून  खाली खेचला आहे. डॉलर इंडेक्समध्ये सहजता आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या भूमिकेत सौम्यपण आल्याने अमेरिकन बॉण्डच्या परताव्यातदेखील  घट झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून पाहू लागले आहेत. ते म्हणाले की सोन्यासाठी एकूणच कल सकारात्मक राहण्याची अपेक्षा आहे आणि अल्पावधीत, स्पॉट मार्केटमध्ये सोन्याचे भाव 1800 डॉलरच्या पातळीवर जाऊ शकतात. तर एमसीएक्सवर (MCX) 52,300 रुपयांच्या पातळीवर जाण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा : किरीट सोमय्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह, 'या' माजी मंत्र्यावर 300 कोटींचा घोटाळ्याचा आरोप

व्याजदर वाढीबाबत यूएस फेडची सौम्य आक्रमक भूमिका

सोन्याच्या किमतीत वाढ होण्याच्या कारणांबद्दल बोलताना जाणकारांचा म्हणणे आहे की, "सोन्याच्या भावात आठवडाभरात सुमारे 2.39% वाढ झाली आहे. मागील आठवड्यातील सकारात्मक तेजी पुढे जाते आहे. दर वाढीबाबत यूएस फेडची भूमिका मवाळ झाली आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्हने प्रचंड अपेक्षेप्रमाणे तीन चतुर्थांश टक्केवारी पॉइंट दर वाढ केली आहे. मात्र अमेरिकन फेडरल रिझर्व्हने आर्थिक गतिविधी मवाळ झाल्याची कबुली दिली ज्यामुळे पुढील वेगवान दर वाढीच्या मार्गाबद्दल चिंता कमी केली आहे आणि सोन्याच्या सुरक्षित खरेदीला प्रोत्साहन मिळाले आहे.

अधिक वाचा : Uddhav Thackeray Mumbai: 'राज्यपाल कोश्यारींना कोल्हापुरी जोडे दाखवा', उद्धव ठाकरेंची जहरी टीका

अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची आकडेवारी

जाणकारांच्या मते सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणूक प्रकाराच्या आकर्षणाला आणखी चालना मिळाली आहे. कारण पहिल्या तीन अंदाजानुसार 0.5 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत अमेरिकेचा जीडीपी 0.9 टक्क्यांनी कमी झाला आहे. हे पहिल्या तिमाहीत 1.6 टक्क्यांच्या वेगाने आकुंचन पावले आहे. वाढत्या किंमतीच्या दबावामुळे आणि आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने वाढीचा वेग कमी होत असताना, अर्थव्यवस्था आणखी बिकट होण्याची परिस्थिती टाळण्यासाठी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह पूर्वीच्या अंदाजापेक्षा व्याजदरात तुलनेत कमी वाढ करेल असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. 

या परिस्थितीमुळे डॉलरचा निर्देशांक 20 वर्षांच्या उच्च 109.30 स्तरांवरून एका पंधरवड्यात 106 अंकांच्या खाली आला. अल्पावधीत डॉलर निर्देशांक 105 पातळीच्या खाली जाण्याची अपेक्षा आहे." अमेरिकन मंदीची भीती आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे अवमूल्यन हे घटक अल्पावधीत सोन्याच्या किंमतीवर वर्चस्व गाजवतील. डॉलरच्या किंमतीतील घसरणीमुळे सोन्याच्या भावात आणखी वाढण्याची अपेक्षा आहे आणि स्पॉट मार्केटमध्ये ते सुमारे 1800 डॉलर प्रति औंस पातळीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी