Gold and Silver Rate Today, 02 August 2022 : नवी दिल्ली : सोन्याच्या भावात (Gold Price) आज मोठी वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या दरात आज 270 रुपयांची मोठी वाढ झाली आहे. तर देशात चांदीचा भाव (Silver Price) स्थिर आहे. भारतात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 51,650 रुपयांच्या पातळीवर आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 47,350 रुपये इतका आहे. तर 1 किलो चांदीचा भाव भारतात 58,000 रुपये आहे. जागतिक स्तरावर डॉलरच्या मूल्यात घसरण झाल्यानंतर सोन्याचा भाव चार आठवड्यांच्या उच्चांकीवर पोचला.(Gold price rises amid weak dollar and fear of inflation)
जागतिक स्तरावर सोन्याच्या भावाने एका महिन्यातील उच्चांक गाठला असतानाही मंगळवारी भारतात सोन्याचे भाव घसरण नोंदवत होते. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर म्हणजे एमसीएक्सवर (MCX),सोन्याचा ऑक्टोबर फ्युचर्स 96 रुपये किंवा 0.2 टक्क्यांनी घसरून 51,530 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा सप्टेंबर फ्युचर्स 256 रुपये किंवा 0.44 टक्क्यांनी घसरून 58,070 रुपये प्रति किलोवर आला.
अधिक वाचा : Chinese Rocket Debris Video: चीनी रॉकेट भारतात कोसळलं, असं का घडलं ते कुणालाचं नाही कळलं!
दरम्यान, 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम दिल्लीत 46,500 रुपये, मुंबईत 47,350 रुपये, चेन्नईमध्ये 48,200 रुपये आणि कोलकाता येथे 47,350 रुपये आहे. दुसरीकडे, 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅमसाठी दिल्लीत 51,820 रुपये, मुंबईत 51,650 रुपये, चेन्नईत 52,580 रुपये आणि कोलकात्यात 51,650 रुपये इतका आहे. काल 400 रुपयांनी घसरल्यानंतर मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी चांदीचा भाव 58,000 रुपयांवर स्थिर आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चलनांचे मूल्य, चलनवाढ, विविध देशांमधील मध्यवर्ती बँकांमधील सोन्याचा साठा, व्याजदर यासह इतर कारणांमुळे सोन्या-चांदीच्या भावात दररोज चढ-उतार होत असतात. राज्यांनी लादलेले कर, उत्पादन शुल्क आणि विविध मेकिंग चार्जेसमुळे सोन्याच्या दागिन्यांचे दरही देशभरात वेगवेगळे असतात. भारतातील चांदीची किंमत आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या किमतींनुसार ठरते. हे डॉलरच्या तुलनेत असणाऱ्या रुपयाच्या मूल्यावरदेखील अवलंबून आहे.
अधिक वाचा : Optical Illusion: समुद्रामध्ये लपली आहे मगर, १० सेकंदात दाखवा शोधून, भले भलेही झाले फेल
आंतरराष्ट्रीय बाजारात, मंगळवारला सोन्याचे भाव चार आठवड्यांच्या उच्चांकावर पोचले आहेत. कारण कमकुवत डॉलर आणि अमेरिकन बॉंडच्या परताव्यातील घसरण यामुळे आर्थिक मंदीच्या वाढत्या चिंतेमुळे सुरक्षित गुंतवणूक प्रकार असणाऱ्या सोन्याची मागणी वाढली. स्पॉट गोल्ड 0.4% वाढून 1,778.69 डॉलर प्रति औंस वर होते. ही 5 जुलै नंतरची उच्चांकी पातळी आहे. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.2% वाढून 1,791.10 डॉलर प्रति औंस झाले, असे वृत्तसंस्थेच्या अहवालात म्हटले आहे.
वाढत्या महागाई आणि भू-राजकीय अनिश्चिततेच्या वाढत्या चिंतेमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. मात्र अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेविषयीच्या सकारात्मक आकडेवारीमुळे सोन्याच्या भावातील पुढील तेजी रोखली आहे.