Gold Price Today | सोन्याच्या भावात तेजी, जाणून घ्या सोन्याचा ताजा भाव

Gold Investment : मागील काही महिन्यांपासून चढउतार होत असलेल्या सोन्याच्या भावात (Gold Price) मागील काही दिवसात वाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Silver Price) वाढ झाली आहे. या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (21 जानेवारी) सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 7416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • सोन्याच्या भावात मागील काही दिवसांपासून वाढ
  • एमसीएक्सवर सोने 88 रुपयांच्या वाढीसह 48468 रुपयांवर
  • 24 कॅरेट सोन्याचा भाव 48705 रुपये प्रति 10 ग्रॅम

Gold Price update: नवी दिल्ली :  मागील काही महिन्यांपासून चढउतार होत असलेल्या सोन्याच्या भावात (Gold Price) मागील काही दिवसात वाढ झाली आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही (Silver Price) वाढ झाली आहे. या आठवड्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी (21 जानेवारी) सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, सोन्याचा भाव 79 रुपयांनी वाढून 48784 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. (Gold price & Silver price surges, check the latest rates)

कमोडिटी बाजारात सोने

याआधी, गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव  48,468 रुपये प्रति दहा ग्रॅमवर ​​बंद झाला होता. तर चांदीचा भाव आज 726 रुपयांनी वाढून 65202 रुपये प्रतिकिलो झाला. गुरुवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी चांदी 64476 प्रति किलो दराने बंद झाली होती.  इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनप्रमाणे, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मध्ये देखील सोन्याच्या किमतीत वाढ होत आहे. एमसीएक्सवर सोने 88 रुपयांच्या वाढीसह 48468 रुपयांवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 244 रुपयांच्या घसरणीसह 65135 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

सोने 7416 आणि चांदी आतापर्यंत 14778 रुपयांनी स्वस्त 

तथापि, यानंतरही, सोने आजही त्याच्या आतापर्यंतच्या उच्चांकापेक्षा 7416 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त आहे. ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने सर्वकालीन उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव 56,200 रुपये प्रति दहा ग्रॅमच्या पातळीवर गेला होता. त्याच वेळी, चांदी त्याच्या सर्वोच्च स्तरावरून सुमारे 14778 रुपये प्रति किलो दराने स्वस्त होत आहे. चांदीचा आतापर्यंतचा उच्चांक 79980 रुपये प्रति किलो आहे.

14 ते 24 कॅरेट सोन्याचा ताजा भाव

अशाप्रकारे, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 48705 रुपये प्रति 10 ग्रॅम, 23 कॅरेट सोन्याचा भाव 48589 रुपये प्रति 10 ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा भाव 44686 रुपये प्रति 10 ग्रॅम, 18 कॅरेट सोन्याचा भाव 36588 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 14 कॅरेट सोने 28539 प्रति 10 ग्रॅम पातळीवर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीची स्थिती

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव तेजीत आहे. अमेरिकेत सोने 1.76 डॉलरच्या वाढीसह 1840.84 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. दुसरीकडे, चांदी 0.05 डॉलरने वाढून 24.44 डॉलर प्रति औंस पातळीवर व्यवहार करत आहे.

सोन्याच्या दागिन्यांवर जीएसटी कमी करण्याची मागणी

ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने  आगामी अर्थसंकल्पात वस्तू आणि सेवा कर (GST) दर १.२५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची सरकारला विनंती केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आगामी अर्थसंकल्पापूर्वीच्या शिफारशींमध्ये, GJC ने सोने, मौल्यवान धातू, रत्ने आणि अशा वस्तूंपासून बनवलेल्या दागिन्यांवर १.२५ टक्के GST ची मागणी केली आहे. सध्या रत्ने आणि दागिन्यांवर जीएसटीचा दर ३ टक्के आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी