Gold Price Today : नवी दिल्ली : देशातील सराफा बाजारात आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात (Gold Price) कोणताही बदल झालेला नाही. सोमवारी संध्याकाळी ज्या दराने सोन्याचा भाव बंद झाला, त्याच भावाने मंगळवारी सोन्याचे दर उघडले. सोमवारी संध्याकाळी 24 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅमचा दर 48142 रुपयांवर बंद झाला, मंगळवारी 48142 च्या दराने उघडला. मात्र, चांदीचा भाव (Silver price) 91 रुपयांनी घसरला. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी किंवा दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली संधी आहे. (Gold price stable, good opportunity to buy the Gold, check the rate)
24 कॅरेट सोन्याचा भाव 48,142 रुपये झाला. सोमवारी सराफा बाजारात सोन्याचा भाव 48,142 रुपयांवर बंद झाला. आजच्या किंमतीत बदल नाही. 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत 47,949 रुपये होती. आता 22 कॅरेट सोन्याची स्पॉट किंमत 44,098 रुपये आहे. त्याच वेळी, 18 कॅरेटची किंमत 36,107 रुपयांवर पोहोचली. आज 14 कॅरेट सोन्याचा भाव 28,163 रुपये होता.
सराफा बाजारात एक किलो चांदीचा भाव 61,668 रुपये होता. काल चांदीचा भाव 61,759 रुपयांवर बंद झाला. चांदी 91 रुपयांनी घसरली.
आता सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. बीआयएस केअर अॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता.
धातू | 18 जानेवारीचा भाव (रुपये/10 ग्राम) | 17 जानेवारीचा भाव (रुपये/10 ग्राम) | भावातील बदल (रुपये/10 ग्राम) |
Gold 999 (24 कॅरेट) | 48142 | 48142 | 0 |
Gold 995 (23 कॅरेट) | 47949 | 47949 | 0 |
Gold 916 (22 कॅरेट) | 44098 | 44098 | 0 |
Gold 750 (18 कॅरेट) | 36107 | 36107 | 0 |
Gold 585 ( 14 कॅरेट) | 28163 | 28163 | 0 |
Silver 999 | 61668 | 61759 | -91 |
सोने खरेदी करताना त्याची गुणवत्ता लक्षात ठेवा. हॉलमार्क पाहूनच सोन्याचे दागिने खरेदी करावेत. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे आणि ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) ही भारतातील एकमेव एजन्सी आहे जी हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.
22 कॅरेट आणि 18 कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल करू शकता. थोड्याच वेळात एसएमएसद्वारे दर प्राप्त होतील. यासोबतच वारंवार येणाऱ्या अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.