Gold price today | घसरणीनंतर सोन्याच्या भावात झाली वाढ तर चांदीची चमकदेखील वाढली, पाहा ताजा भाव

Gold rate : मागील एक महिन्यात नीचांकी पातळी गाठल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. मागील सत्रात डॉलर दोन वर्षांच्या उच्चांकावरून कमी झाला, ज्यामुळे ग्रीनबॅक-किंमत असलेले सोने स्वस्त झाले. आर्थिक आणि राजकीय संकटांच्या काळात सोन्याकडे मूल्याचे सुरक्षित भांडार म्हणून पाहिले जाते. MCX वर सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.

Gold Price Today
सोन्याचा ताजा भाव 
थोडं पण कामाचं
  • घसरणीनंतर वाढले सोने आणि चांदीचे भाव
  • लग्नसराई आणि लांबलेले युक्रेन युद्ध यामुळे सोन्याची चमक परतली
  • गुंतवणुकदारांकडून सोन्यातून नफा वसूली

Gold Price Today 25 April 2022 update : नवी दिल्ली : मागील एक महिन्यात नीचांकी पातळी गाठल्यानंतर मंगळवारी सोन्याच्या भावात (Gold Price)  वाढ झाली. मागील सत्रात डॉलर दोन वर्षांच्या उच्चांकावरून कमी झाला, ज्यामुळे ग्रीनबॅक-किंमत असलेले सोने स्वस्त झाले. आर्थिक आणि राजकीय संकटांच्या काळात सोन्याकडे मूल्याचे सुरक्षित भांडार म्हणून पाहिले जाते. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.17 टक्क्यांनी वाढले किंवा 88 रुपये प्रति 10 ग्रॅम 51,550 झाले. दरम्यान, चांदीचा भाव (Silver Price) 0.57 टक्क्यांनी वाढून 369 रुपयांनी वाढून 65,485 रुपये प्रति किलोवर पोहोचला. (Gold price surged from low level, silver also rises)

मेहता इक्विटीजचे कमोडिटीजचे व्हीपी राहुल कलंत्री यांनी सांगितले की, आठवड्याची सुरुवात सोन्या-चांदीने मोठ्या विक्रीच्या दबावाने केली आणि सोन्याने जवळपास चार आठवड्यांच्या नीचांकी पातळी गाठली. तर चांदी नऊ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर गेली. "मोठी घसरण होऊनदेखील, लग्नाचा हंगाम आणि अक्षय्य तृतीया पुढील महिन्याच्या सुरुवातीला येत असल्याने ते येत्या काही दिवसांत सोन्याच्या भावात वाढ होण्याची चिन्हे आहेत," असे ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : Jeff Bezos on Musk | इलॉन मस्कने ट्विटर विकत घेतल्यावर, जेफ बेझॉस यांना चीनबद्दल आहे मोठी शंका...पाहा काय आहे प्रकरण

सोन्याची चमक परतली

जरी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Urkaine War) आणि जागतिक महागाईत सातत्याने वाढ होताना दिसत असली तरी, बाजारातील गुंतवणुकदार आता अमेरिकेतील बॉण्ड्समधील (US Bonds) वाढत्या परताव्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. यामुळे सोने आणि चांदीची चमक कमी होताना दिसते आहे.

सोन्याचा ताजा भाव

भारतीय सराफा आणि ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, स्पॉट मार्केटमध्ये, सर्वोच्च शुद्धतेचे सोने प्रति 10 ग्रॅम 52,077 रुपयांवर होते तर चांदीची किंमत 65,166 रुपये प्रति किलो इतकी होती. सोन्याच्या स्पॉट किंमती एका आठवड्यात 1,500 रुपये प्रति 10 ग्रॅमपेक्षा जास्त घसरल्या आहेत, तर चांदीच्या किंमती गेल्या सहा दिवसांत सुमारे 5,200 रुपये प्रति किलो घसरल्या आहेत.

अधिक वाचा : LIC IPO Date | इंतजार खत्म ! 4 मे ला येणार एलआयसीचा आयपीओ... सोडू नका सरकारच्या दुभत्या गाईकडून कमाईची मोठी संधी...7 महत्त्वाच्या गोष्टी

शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधन प्रमुख रवी सिंग यांनी सांगितले की, गुंतवणुकदार इक्विटी मार्केटमधील मार्जिन भरण्यासाठी निधी काढत असल्याने सोन्याच्या किंमतीत नफावसूली होते आहे. "युक्रेनच्या संकटामुळे आणि जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचा संभाव्य परिणाम यामुळे सोन्याला सुरक्षित गुंतवणूक प्रकार म्हणून मागणी असली तरी, मजबूत डॉलर आणि बॉंड्सच्या परताव्यातील वाढ नफा मर्यादित करत आहे," ते पुढे म्हणाले.

अधिक वाचा : SBI Internet Alert | स्टेट बॅंकेने ग्राहकांना दिल्या इंटरनेट सुरक्षेसाठीच्या सूचना, चटकन जाणून घ्या 8 महत्त्वाचे मुद्दे ...नाहीतर होईल नुकसान

जागतिक बाजारपेठेतील भाव

स्पॉट गोल्ड 0.3 टक्क्यांनी वाढून 1,902.46 डॉलर प्रति औंस होते. तर अमेरिकेतील सोन्याचे वायदे 0.34 वर 1,902.60 डॉलरवर होते. स्पॉट सिल्व्हर 1 टक्‍क्‍यांनी वाढून 23.85 डॉलर प्रति औंस, प्‍लॅटिनम 0.6 टक्‍क्‍यांनी वाढून 926.00 डॉलर आणि पॅलेडियम 2.1 टक्‍क्‍यांनी वाढून 2,189.18  डॉलरवर पोचले. पॅलेडियमच्या किमती सोमवारी जवळपास 13 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी पुढील महिन्यात 50 बेसिस-पॉइंट वाढीला मान्यता दिल्यानंतर यूएस फेडरल रिझर्व्ह पुढच्या काही महिन्यांत मोठ्या बदलांची अंमलबजावणी करेल अशी ट्रेडर्सना शक्यता वाटते आहे. त्यामुळे याचा सोन्यावर दबाव आहे. युक्रेनचे संकटाचा प्रभाव गुंतवणुकदारांवर आहे, मात्र सोन्याचा भाव हा अमेरिकन फेडरल रिझर्वहचे अल्पकालीन मुदतीचे व्याजदर आणि वाढलेला परतावा यावर जास्त अवलंबून आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी