Gold Rate Today, 02 December 2019: सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Dec 02, 2019 | 18:54 IST

Gold Rate/Price Today (गोल्ड रेट टुडे) 02 December 2019: सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी आज चांगली संधी आहे. 

gold price today 2 december 2019 gold rate slash down silver price slash coin ornaments
Gold Rate Today, 02 December 2019: सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही घसरण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • सोन्याच्या दरात घट, ग्राहकांना मोठा दिलासा
  • सोन्यासोबत चांदीचे दरही घसरले, आतंरराष्ट्रीय बाजारातही घसरण
  • सोन्याच्या मागणी कमी असल्याने दरात घसरण

मुंबई: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची विक्री आणि थोक बाजारातील कमकुवत मागणीमुळे सोमवारी दिल्लीत सोन्याचा भाव १६१ रुपयांनी घसरून ३८,७१८ रुपयांवर आला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, शनिवारी सोन्याचा दर हा ३८,८७९ रुपये प्रति १० ग्राम एवढ्या किंमतीवर बंद झाला होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (जिंस) तपन पटेल यांनी असं म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीदरम्यान २४ कॅरेट सोन्याचा थोक भावामध्ये १६१ रुपयांची घट झाली आहे. थोक बाजारात कमकुवत मागणीमुळे सोन्याच्या दरात घट झाली असण्याचं सांगण्यात येत आहे. 

मुंबईतील सोन्याचे दर: 

  1. २२ कॅरेट सोनं - आजचे दर ३७,३०० रुपये प्रति १० ग्राम 
  2. २४ कॅरेट सोनं - आजचे दर ३८,३०० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

  1. चांदी- आजचे दर ४६,६५० रुपये प्रति १ किलो 

सोन्यासोबतच चांदीच्या दरात देखील ४२५ रुपयांची घट झाली असून आज चांदीचा दर हा ४५,७३० रुपये प्रति किलो एवढा आहे. शेवटच्या व्यावसायिक दिवसात चांदीचा दर हा ४६,१५५ रुपये एवढा होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दरात घसरण झाली असून त्याची किंमत १,४५६ डॉलर प्रति औंस एवढी आहे. तर चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली असून त्याची किंमतीत १६.४८ डॉलर प्रति औंस एवढी आहे. 

याबाबत बोलताना तपन पटेल यांनी असंही सांगितलं की, सोन्याचे दर जागतिक पातळीवर घसरले आहेत कारण चीनचा पीएमआय उत्पादनांचे आकडे हे सकारात्मक राहिले आहेत. तसचं डॉलर मजबूत झाल्याने वैश्विक स्तरावर सोन्याचे दर घसरले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी