Gold Price Today: उच्च स्तरावरून घसरले सोने, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या का आहे आजचा दर 

काम-धंदा
Updated Jan 07, 2020 | 19:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

 Gold Price: सोमवारी उच्च स्तरावर गेल्यानंतर सोन्याच्या भावात मंगळवारी घट दिसून आली. तर चांदीचा दरही कमी झाला आहे. जाणून घ्या सोन्या-चांदीचा दर.. 

 gold price today down by rs 420 and silver by rs 830 on 7 january 2020 in delhi sarafa business news in marathi
Gold Price Today: उच्च स्तरावरून घसरले सोने, चांदीही झाली स्वस्त, जाणून घ्या का आहे आजचा दर   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  सोन्याच्या भावात मंगळवारी घट दिसून आली. मंगळवारी राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव ४२० रुपयांनी खाली आला. त्यामुळे १० ग्रॅम सोन्याचा दर ४१ हजार २१० रुपयांच्या स्तरावर पोहचला. रुपयांत आलेल्या मजबुतीमुळे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात मूल्यवान मेटलमध्ये प्ऱॉफीट बुकिंग झाल्यामुळे सोन्याचा दर खाली आले. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. 

दुसरीकडे चांदीच्या दरातही घट दिसून आली. चांदीचा दर ८३० रुपयांनी घसरून ४८ हजार ६०० रुपये प्रति किलोग्रॅमच्या स्तरावर पोहचला. गेल्या कारभारी सत्रात चांदीचा दर ४९ हजार ४३० रुपये प्रति किलोग्रॅम बंद झाला होता.  सोमवारी चांदी आतापर्यंतच्या आपल्या उच्चांकी किंमतीवर पोहचली होती. सोमवारी सोन्याचा भाव ४१ हजार ६३० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. 

मुंबईतील सोन्याचे दर:

२२ कॅरेट सोनं - आजचे दर ३९,७०० रुपये प्रति १० ग्राम 
                      कालचे दर ३९,७०० रुपये प्रति १० ग्राम

 

२४ कॅरेट सोनं - आजचे दर ४०,७०० रुपये प्रति १० ग्राम
                      कालचे दर ४०,७०० रुपये प्रति १० ग्राम

मुंबईतील चांदीचे दर:

चांदी- आजचे दर ५०,७५० रुपये प्रति १ किलो 
         कालचे दर ५१,०००  रुपये प्रति १ किलो

एचडीएफसी सिक्युरिटीजचे प्रमुख सल्लागार देवर्ष वकील यांनी सांगितले की, रुपयांमध्ये मजबुती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात प्रॉफिट बुकिंगमुळे स्थानिक बाजारात सोन्याचा भाव घसरला. व्यापारी १५ जानेवारी नंतर होणाऱ्या लग्न समारंभ आणि सणानिमित्त होणाऱ्या मागणीमुळे आश्वस्त आहेत. रुपया डॉलरच्या तुलेने २२ पैसे मजबूत झाला. त्यामुळे डॉलरचा दर ७१,७१ रुपयांच्या स्तरावर पोहचला. 

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याचा भाव घसरून १५६९ डॉलर प्रति औंसवर पोहचला, तर चांदीचा भाव १८.१९ डॉलर प्रति औंसवर राहिला. वकील यांनी सांगितले की, आगामी अल्प कालीन विचार करता, अमेरिका आणि इराण  तणाव आणि अमेरिका-चीन व्यापार करार यावर सर्व लक्ष केंद्रीत असणार आहे. या अनिश्चितेमुळे सोन्या-चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी