Gold Price :सोने झाले स्वस्त, चांदीत आली खाली, जाणून घ्या संध्याकाळचे भाव

Gold/Silver price, 15 October 2020 : स्थानिक बाजारात गुरूवारी सोने-चांदीत घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 32 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट झाली.

gold 15 October retail price
Gold Price :सोने झाले स्वस्त  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • स्थानिक बाजारात गुरूवारी सोने-चांदीत घट पाहायला मिळाली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत  घट दिसून आली.
  • सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली.

Retail Gold and Silver Rate, 15 October, नवी दिल्ली : स्थानिक बाजारात गुरूवारी सोने-चांदीत घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 32 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट होऊन 51,503 रुपयांवर पोहचला. सिक्युरिटीनुसार कमी मागणीमुळे सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली.  या प्रमाणे गेल्या सत्रात दिल्लीत सोन्याचा दर (Gold Price) 51,535 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. 

सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही जबरदस्त घट दिसन आली. चांदी किंमत 626 रुपयांची घटीसह 62,410 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली होती. यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 63,62,410 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

वैश्विक बाजारात सोने-चांदीची कीमत

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत  घट दिसून आली. 1,901 डॉलर प्रति औंस किंमत होती. तर चांदीची किंमत 24.18 डॉलर प्रति औंसवर होती. 

सिक्युरिटीचे सीनिअर अनालिसिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किंमतीवर दबाव पाहायला मिळाला. गुंतवणूकदारांनी सुरक्षित पर्याय म्हणून डॉलरमध्ये गुंतवणूक केली. 

महाराष्ट्रात सोन्यात घट, चांदी गडगडली

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली.  आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 50  रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,550 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 49,550 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर  50,600 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,600 रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी  चांदीच्या दरात सुरूवातीला घट दिसून आली. चांदीत 700 रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल 62000वर असलेली चांदी आज   61000 रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ५५० ५० हजार ६००
पुणे  ५० हजार ५५० ५० हजार ६००
जळगाव  ५० हजार ५५० ५० हजार ६००
कोल्हापूर ५० हजार ५५० ५० हजार ६००
लातूर ५० हजार ५५० ५० हजार ६००
सांगली ५० हजार ५५० ५० हजार ६००
बारामती  ५० हजार ५५० ५० हजार ६००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
पुणे  ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
जळगाव  ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
कोल्हापूर ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
लातूर ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
सांगली ४९ हजार ५५० ४९ हजार ६००
बारामती  ४९ हजार ५५० ४९ हजार ६००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६१ हजार ००० ६२ हजार ०००
पुणे  ६१ हजार ००० ६२ हजार ०००
जळगाव  ६१ हजार ००० ६२ हजार ०००
कोल्हापूर ६१ हजार ००० ६२ हजार ०००
लातूर ६१ हजार ००० ६२ हजार ०००
सांगली ६१ हजार ००० ६२ हजार ०००
बारामती  ६१ हजार ००० ६२ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी