Gold Price : सोने झाले स्वस्त, चांदीत वाढ, जाणून घ्या संध्याकाळचे भाव

Today Retail Gold and Silver Rate| आजचे सोने चांदी दर : स्थानिक बाजारात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली. सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही वाढ दिसून आली.

gold 27 October retail price
Gold Price : सोने झाले स्वस्त 

थोडं पण कामाचं

  • निक बाजारात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली.
  • सिक्युरिटीनुसार कमी मागणी आणि रुपया मजबूत झाल्यामुळे ही घट दिसून आली.

नवी दिल्ली : स्थानिक बाजारात मंगळवारी सोन्यात घट पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 137 रुपये प्रति 10 ग्रॅमची घट होऊन 51,108 रुपयांवर पोहचला. सिक्युरिटीनुसार कमी मागणी आणि रुपया मजबूत झाल्यामुळे ही घट दिसून आली.  या प्रमाणे गेल्या सत्रात दिल्लीत सोन्याचा दर (Gold Price) 51,245 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. 

सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही वाढ दिसून आली.  चांदी किंमत 475 रुपयांची घटीसह 62,648 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली होती. यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 62,173 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

भारतीय रुपयाबाबत बोलायचे झाले तर मंगळवारी स्थानिक शेअर बाजारात सकारात्मक कल पाहता १३ पैशांनी रुपया मजबूत झाला. त्यामुळे एका डॉलरचे मूल्य 73.71 वर बंद झाले.  


महाराष्ट्रात सोन्यात घट, चांदी चमकली

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली.  आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 50  रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,900 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर 49,900 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर  50,950 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,950 रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी  चांदीच्या दरात सुरूवातीला वाढ दिसून आली. चांदीत 600 रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल 61,500 वर असलेली चांदी आज  62,100 रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ९०० ५० हजार ९५०
पुणे  ५० हजार ९०० ५० हजार ९५०
जळगाव  ५० हजार ९०० ५० हजार ९५०
कोल्हापूर ५० हजार ९०० ५० हजार ९५०
लातूर ५० हजार ९०० ५० हजार ९५०
सांगली ५० हजार ९०० ५० हजार ९५०
बारामती  ५० हजार ९०० ५० हजार ९५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
पुणे  ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
जळगाव  ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
कोल्हापूर ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
लातूर ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
सांगली ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०
बारामती  ४९ हजार ९०० ४९ हजार ९५०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६२ हजार १०० ६१ हजार ५००
पुणे  ६२ हजार १०० ६१ हजार ५००
जळगाव  ६२ हजार १०० ६१ हजार ५००
कोल्हापूर ६२ हजार १०० ६१ हजार ५००
लातूर ६२ हजार १०० ६१ हजार ५००
सांगली ६२ हजार १०० ६१ हजार ५००
बारामती  ६२ हजार १०० ६१ हजार ५००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी