Gold Price : सोने झाले महाग, चांदीच्या भावात तेजी, जाणून घ्या संध्याकाळचे भाव

 राष्ट्रीय राजधानीमध्ये रुपयात झालेल्या घटीमुळे स्थानिक बाजारात  बुधवारी सोन्यात वाढ पाहायला मिळाली.

gold price today gold 28 October retail price
Gold Price : सोने झाले महाग 

थोडं पण कामाचं

  •  राष्ट्रीय राजधानीमध्ये रुपयात झालेल्या घटीमुळे स्थानिक बाजारात  बुधवारी सोन्यात वाढ पाहायला मिळाली.
  • सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही जबरदस्त वाढ दिसून आली.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत  वाढ दिसून आली.

नवी दिल्ली :  राष्ट्रीय राजधानीमध्ये रुपयात झालेल्या घटीमुळे स्थानिक बाजारात  बुधवारी सोन्यात वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किंमतीत 188 रुपये प्रति 10 ग्रॅमची वाढ होऊन 51220 रुपयांवर पोहचला.  या प्रमाणे गेल्या सत्रात दिल्लीत सोन्याचा दर (Gold Price) 51,032 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचला होता. 

सराफा बाजारात सोन्यासोबत चांदीतही जबरदस्त वाढ दिसून आली.  चांदी किंमत 342 रुपयांची वाढीसह 62,712 रुपये प्रति किलोग्रॅमवर पोहचली होती. यापूर्वीच्या सत्रात चांदीची किंमत 62,812 रुपये प्रति किलोग्रॅम होती.

वैश्विक बाजारात सोने-चांदीची कीमत

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत  वाढ दिसून आली. 1,906.70  डॉलर प्रति औंस किंमत होती. तर चांदीची किंमत 24.45  डॉलर प्रति औंसवर होती. 

एचडीएफसीसिक्युरिटीचे सीनिअर अनालिसिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की, भारतात सोन्याच्या किंमती वाढ झाली. दिवसात २४ कॅरेट सोन्याच्या किंमती १८८ रुपयांची तेजी दिसली. 

स्थानिक इक्विटी बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री दिसली आणि अमेरिकन डॉलरमध्ये मजबूतमुळे बुधवारी १६ पैशांच्या घट दिसली त्यामुळे डॉलरचे मूल्य 73.87 वर बंद झाले. 

महाराष्ट्रात सोने स्वस्त, चांदीत वाढ

सोन्याच्या दरात आज सुरूवातीच्या कारभारात घट दिसून आली.  आज सोनं प्रति ग्राम 10 ग्रॅम 50  रुपयांनी स्वस्त झाले. प्रति 10 ग्रॅमसाठी 24 कॅरेट सोन्याचा आजचा दर 50,850 रुपयांवर सुरू आहे. तर प्रति 10 ग्रॅमसाठी 22 कॅरेट सोन्याचा आजचा दर  49,850 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,900 रुपयांवर बंद झाला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,900 रुपयांवर  बंद झाला होता.

सोन्याच्या दरात घट झाली असली तरी  चांदीच्या दरात सुरूवातीला वाढ दिसून आली. चांदीत 300 रुपये प्रति किलोची वाढ झाली.  काल 62,100 वर असलेली चांदी आज  62, 400 रुपयांवर विक्री सुरू आहे. 

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ५० हजार ८५० ५० हजार ९००
पुणे  ५० हजार ८५० ५० हजार ९००
जळगाव  ५० हजार ८५० ५० हजार ९००
कोल्हापूर ५० हजार ८५० ५० हजार ९००
लातूर ५० हजार ८५० ५० हजार ९००
सांगली ५० हजार ८५० ५० हजार ९००
बारामती  ५० हजार ८५० ५० हजार ९००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
पुणे  ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
जळगाव  ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
कोल्हापूर ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
लातूर ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
सांगली ४९ हजार ८५० ४९ हजार ९००
बारामती  ४९ हजार ८५० ४९ हजार ९००

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६२ हजार ४०० ६२ हजार १००
पुणे  ६२ हजार ४०० ६२ हजार १००
जळगाव  ६२ हजार ४०० ६२ हजार १००
कोल्हापूर ६२ हजार ४०० ६२ हजार १००
लातूर ६२ हजार ४०० ६२ हजार १००
सांगली ६२ हजार ४०० ६२ हजार १००
बारामती  ६२ हजार ४०० ६२ हजार १००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी