नवी दिल्ली : स्थानिक बाजारात सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत तेजी पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या नुसार राष्ट्रीय राजधानी दिल्ली सोमवारी सोन्याचा भाव 389 रुपये प्रति 10 ग्रॅम तेजी दिसून आली आहे. या तेजीमुळे सोन्याचा भाव 48,866 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. गेल्या सत्रात सोने 48,477 रुपये प्रति 10 ग्रॅमवर भाव बंद झाला होता.
चांदीच्या भावात सोमवारी जबरदस्त वाढ पाहायला मिळाली. चांदीमध्ये 1,137 रुपयांची वाढ झाली. या वाढीमुळे चांदीची किंमत 64,726 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. गेल्या सत्रात चांदी 63,589 रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.
सिक्युरिटीनुसार मौल्यवान धातूची वैश्विक किंमतीत तेजी आणि रुपयांचे मूल्य खाली आल्याने स्थानिक बाजारात सोन्याचा भावात वाढ दिसून आली. याच कारणांमुळे वायदा बाजारातही तेजी दिसून आली.
उल्लेखनीय म्हणजे सोमवारच्या सुरूवातीला कारबारात मुद्रा बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य २४ पैशांनी तुटून ७३.४८ च्या स्तरावर गेले होते.
आंतरराष्ट्री स्तरावर सोन्याचे मूल्य वाढीसह 1,853 डॉलर प्रति औंस वर ट्रेंड करत होता. तर चांदींची किंमत 25.14 डॉलर प्रति औंस वर सपाट होती.
एचडीएफसी सिक्युरिटीजच्या सिनिअर एनालिस्टिस्ट तपन पटेल यांनी सांगितले की, डॉलरमध्ये मजबुती असताना शुक्रवारी सोन्याच्या दरात तेजी पाहायला. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणाची चिंतेमुळे पिवळ्या धातू खरेदी करण्यात आली.
हाजीर बाजाराच्या विपरीत वायदा बाजारात सोन्याच्या दरात तेजी दिसून आली मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर दुपारी 04:34 वाजता फेब्रुवारीमध्ये डिलेव्हरीच्या सोन्याचा भाव 286 रुपय म्हणजे 0.58 टक्के तेजी 49,253 रुपये प्रति 10 ग्रॅम पर ट्रेंड करत होता. MCXवर एप्रिलच्या डिलेव्हरीच्या सोन्याचा भाव 267 रुपये म्हणजे 0.54 टक्के वाढीसह 49,279 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ट्रेंड करत होता.