नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत गुरुवारी सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे सोन्याचे भाव आज 182 रुपयांनी वाढून 45,975 रुपये प्रति १० ग्रॅम झाले. मागील व्यापारात सोन्याचा दर 10 ग्रॅम साठी 45,793 रुपयांवर बंद झाला होता. आज सोन्याच्या वाढीसह चांदी देखील 682 रुपयांनी महाग झाली, त्यामुळे चांदीचा दर 66,175 रुपये प्रति किलो झाला आहे. मागील सत्रात एक किलो चांदीच्या दर 65,450 रुपये होता.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी सांगितले की दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 182 रुपयांनी वधारल्या आहेत. कॉमेक्स (न्यूयॉर्कस्थित कमोडिटी एक्सचेंज) सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही स्थानिक बाजारात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोने प्रति औंस 1,744 अमेरिकन डॉलर्स आणि चांदी प्रति औंस 25.30 अमेरिकन डॉलरवर स्थिर आहे.
जून 2021 मध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये दुपारी 04:38 वाजता, डिलीव्हरी सोन्याची किंमत 293.00 रुपये म्हणजेच 0.63 टक्क्यांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 46655 रुपयांवर होती. त्याचप्रमाणे ऑगस्टमध्ये डिलिव्हरी सोन्याचा दर 257.00 रुपयांनी म्हणजेच 0.55 टक्क्यांनी वाढून 46603.00 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला.
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर मे 2021 मध्ये संध्याकाळी 04:40 वाजता चांदीचा भाव 641.00 रुपयांच्या वाढीसह म्हणजे 0.96 टक्क्यांनी वाढून 67275.00 रुपये प्रतिकिलो होता.