Gold Price : सोन्याच्या किंमतीत वाढ, चांदी चमकली, जाणून घ्या संध्याकाळचे भाव 

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीज सोन्यात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची वाढ नोंदली. यासह दिल्लीतील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47,185 रुपयांवर पोहोचला.

gold price today gold rate increases in spot market silver price soars heavily know the latest rate on 7 may 2021
Gold Price : सोन्याच्या किंमतीत वाढ 

थोडं पण कामाचं

  • शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली.
  • एचडीएफसी सिक्युरिटीज सोन्यात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची वाढ नोंदली.
  • यासह दिल्लीतील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47,185 रुपयांवर पोहोचला.

नवी दिल्ली : शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीज सोन्यात प्रति 10 ग्रॅम 474 रुपयांची वाढ नोंदली. यासह दिल्लीतील सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 47,185 रुपयांवर पोहोचला. मागील सत्रात म्हणजेच गुरुवारी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,711 रुपये होती. सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर मौल्यवान धातूंच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती वाढल्या. 

दिल्लीत चांदीचा दर

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, राष्ट्रीय राजधानीत आठवड्यात अखेरच्या व्यापार सत्रात चांदीच्या किंमती 1050 रुपयांनी वाढल्या. यामुळे शहरातील चांदीचा दर प्रति किलो 70,791 रुपये झाला. याआधी गुरुवारी दिल्लीत चांदीचा एक किलोचा दर 69,741 रुपये होता. 


देशांतर्गत बाजारात सोन्याचा दर यामुळे वाढला आहे

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, "जागतिक पातळीवर सोन्याच्या जोरदार खरेदीमुळे दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅम 474 रुपयांची वाढ झाली आहे."

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याची किंमत

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचा भाव प्रति औंस 1,820 डॉलर होता. त्याचबरोबर चांदीची किंमत प्रति औंस 27.33 डॉलरवर स्थिर राहिली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी