Gold Price : सोनं झालं स्वस्त, चांदीच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या,  जाणून घ्या संध्याकाळचे हाजीर भाव

गुरुवारी सोने-चांदीच्या किंमतीतही घट झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांची घसरण झाली.

gold price today gold rate of 4 march 2021
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, चांदीही घसरली  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गुरुवारी सोने-चांदीच्या किंमतीतही घट झाली.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांची घसरण झाली.
  • राष्ट्रीय राजधानीत चांदीच्या किंमतीत जोरदार घसरण झाली.

नवी दिल्ली :  गुरुवारी सोने-चांदीच्या किंमतीतही घट झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांची घसरण झाली. यामुळे दिल्लीतील सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅमसाठी 44,372 रुपयांवर राहिले. सिक्युरिटीजनुसार कोविड -१९ लसीच्या मागणीमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आहे.  एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 44,589 रुपये होती. 

दिल्लीत चांदीचा भाव

राष्ट्रीय राजधानीत चांदीच्या किंमतीत जोरदार घसरण झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते दिल्लीत चांदी 1,217 रुपयांनी घसरून 66,598 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, "दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 217 रुपयांनी घट झाली." रुपयाच्या मूल्यात घसरण असूनही कॉमेक्सवरील रात्रीच्या सत्रात ही घसरण दाखवत आहे. ''

दरम्यान, अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैशांनी कमकुवत होत होता. 

डॉलरची मजबुती आणि अमेरिकन बाँडमधून मिळणारी वाढ यामुळे सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे पटेल म्हणाले.

ते म्हणाले की ही लस लागू झाल्यानंतर जोखिमीच्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याविषयीची धारणा दृढ झाली आहे आणि यामुळे सुरक्षित क्षेत्र मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी कमी झाली आहे. 

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात 470 रुपये प्रति 10 ग्रॅमने घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 44,900 रुपये झाला. गेल्या सत्रात हा दर 45,370 रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 43,900 रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर 44,370 रुपये इतका होता. तर यासोबतच चांदीच्या भावात 1700 रुपये प्रति किलोग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे 67,900 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 66,200 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
पुणे  ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
जळगाव  ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
कोल्हापूर ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
लातूर ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
सांगली ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०
बारामती  ४४ हजार ९०० ४५ हजार ३७०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
पुणे  ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
जळगाव  ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
कोल्हापूर ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
लातूर ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
सांगली ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०
बारामती  ४३ हजार ९०० ४४ हजार ३७०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६६ हजार २०० ६७ हजार ९००
पुणे  ६६ हजार २०० ६७ हजार ९००
जळगाव  ६६ हजार २०० ६७ हजार ९००
कोल्हापूर ६६ हजार २०० ६७ हजार ९००
लातूर ६६ हजार २०० ६७ हजार ९००
सांगली ६६ हजार २०० ६७ हजार ९००
बारामती  ६६ हजार २०० ६७ हजार ९००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी