Gold Price :  सोनं महाग झाले, चांदीचा भावही वाढला,  जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

सोमवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 411 रुपयांनी वाढल्या.

gold price today gold rate rises silver price also soars know the rate on 19 april 2021
Gold Price Today:  सोनं महाग झाले, चांदीचा भावही वाढला 

थोडं पण कामाचं

  • सोमवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 411 रुपयांनी वाढल्या.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने प्रति औंस 1,787 डॉलरवर होता. त्याचप्रमाणे चांदीचा भाव प्रति औंस 26.08 डॉलर होता. 

नवी दिल्ली : सोमवारी सोन्याच्या किंमतीत जोरदार वाढ झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 411 रुपयांनी वाढल्या. यासह शहरातील सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 47,291 रुपयांवर पोचला. मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 46,880 रुपये होती. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते जागतिक स्तरावर सोन्याच्या मागणीत जोरदार वाढ आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे देशांतर्गत सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. उल्लेखनीय आहे की आठवड्याच्या पहिल्या सत्रात चलन बाजारामध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 52 पैशांनी घसरून 74.87 वर आला. 

दिल्लीत चांदीची किंमत (Silver Price in Delhi)

एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानीत चांदीची किंमत 338 रुपयांनी वाढून 68,335 रुपये झाली. मागील सत्रात चांदीचा दर प्रतिकिलो 67,997 रुपये होता. 


ग्लोबल मार्केटमध्ये सोने आणि चांदीची किंमत

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने प्रति औंस 1,787 डॉलरवर होता. त्याचप्रमाणे चांदीचा भाव प्रति औंस 26.08 डॉलर होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, “डॉलरमधील नरमपणा आणि अमेरिकेत बाँडच्या उत्पन्नातील घट यामुळे सोन्याच्या किंमती जागतिक स्तरावर वाढल्या आहेत.”

सोन्याचा वायदा भाव

जून 2021 मध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये संध्याकाळी  05:20 वाजता डिलिव्हरी सोन्याची किंमत 267 रुपये म्हणजेच 0.56 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 47,620 रुपयांवर आली. त्याचप्रमाणे ऑगस्ट कराराचे सोन्याचे दर 259 रुपये किंवा 0.54 रुपयांच्या वाढीसह प्रति १० ग्रॅम 47,850 रुपयांवर होते.

चांदी वायदा किंमत

मे २०२१ मध्ये, डिलीव्हरी चांदीची किंमत 305 रुपये म्हणजेच 0.44  टक्क्यांनी वाढून 68,989 रुपये प्रति किलो झाली. जुलैमध्ये चांदीची किंमत 274 रुपये किंवा 0.39 टक्क्यांनी वाढून 70,062 रुपयांवर झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी