शेअर बाजारातील घसरणीनंतर 'हे' झाले सोने, चांदीचे दर

gold price today gold rate silver price 22 February 2021 शेअर बाजारातील घसरणीचे पडसाद सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांवरही दिसले.

gold price today gold rate silver price 22 February 2021
शेअर बाजारातील घसरणीनंतर 'हे' झाले सोने, चांदीचे दर 

थोडं पण कामाचं

  • शेअर बाजारातील घसरणीनंतर 'हे' झाले सोने, चांदीचे दर
  • शेअर बाजारात मोठी घसरण, सोने आणि चांदीचा दर वाढला
  • वायदे बाजारातील दरांवर परिणाम

मुंबईः केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये कोरोना संकटाची तीव्रता वेगाने वाढत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा धोका निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन जाहीर करण्याआधी नागरिकांना ८ दिवसांचे अल्टिमेटम जाहीर केले आहे. या घडामोडींचा प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे शेअर बाजार घसरला. शेअर बाजारातील घसरणीचे पडसाद सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांवरही दिसले. (gold price today gold rate silver price 22 February 2021)

शेअर बाजारात मोठी घसरण

अनेक दिवसांनंतर शेअर बाजारात मोठी घसरण झाली. सोमवारी २२ फेब्रुवारी रोजी बीएसई सेन्सेक्स ११४५.४४ पॉइंट घसरला आणि ४९७४४.३२ वर बंद झाला. तसेच निफ्टी फिफ्टी इंडेक्स ३०६.०५ पॉइंट घसरला आणि १४६७५.७० वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्समध्ये २.२५ टक्के तर निफ्टी फिफ्टी इंडेक्समध्ये २.०४ टक्के घसरण झाली. बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य मागच्या आठवड्यात २०३.९८ लाख कोटी रुपये होते. ते सोमवारी संध्याकाळी २००.१९ लाख कोटी रुपयांवर आले. गुंतवणूकदारांचे ३.७९ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. डॉलरच्या तुलनेत रुपयात १६ पैशांची वाढ झाली. रुपया ७२.४९ या पातळीवर बंद झाला. या सर्व घडामोडींचे पडसाद सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या दरांवर पडले. 

सोन्याचा दर २७८ रुपयांनी, चांदीचा दर २६५ रुपयांनी वाढला

अमेरिकन बाँड यील्डमध्ये वाढ झाली. दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर २७८ रुपयांनी वाढला तर एक किलो चांदीचा दर २६५ रुपयांनी वाढला. यामुळे सोमवारी २२ फेब्रुवारी २०२१ रोजी संध्याकाळी दहा ग्रॅम अर्थात एक तोळा सोन्याचा दर ४६ हजार १३ रुपयांवर बंद झाला. तसेच एक किलो चांदीचा दर ६८ हजार ५८७ रुपयांवर बंद झाला. याआधी शुक्रवारी एक तोळा सोन्याचा दर ४५ हजार ७३५ रुपये तर एक किलो चांदीचा दर ६८ हजार ३२२ रुपये होता.

वायदे बाजारातील दरांवर परिणाम

वायदे बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीवर परिणाम झाला. एमसीएक्स एक्सचेंजमध्ये (The Multi Commodity Exchange of India Limited - MCX) संध्याकाळी ६.३५ वाजता एप्रिल २०२१च्या सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ३८९ रुपयांनी वाढली आणि ४६ हजार ५८६ रुपयांवर पोहोचली. तसेच जून २०२१च्या सोन्याची किंमत एक तोळ्यासाठी (१० ग्रॅम सोने) ३२५ रुपयांनी वाढली आणि ४६ हजार ६६५ रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल २०२१साठी सोन्याचा दर १९.२५ (+१.०८ टक्के) वाढीसह १७९६.६५ डॉलर प्रति औंस झाली.

एमसीएक्स एक्सचेंजमध्ये (The Multi Commodity Exchange of India Limited - MCX) संध्याकाळी एप्रिल २०२१च्या एक किलो चांदीची किंमत ४२७ रुपयांनी वाढून ६९ हजार ४३९ रुपयांवर पोहोचली. मे २०२१च्या एक किलो चांदीची किंमत ३९३ रुपयांनी वाढून ७० हजार ५५२ रुपयांवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात मार्च २०२१च्या चांदीची किंमत ०.२६ (+०.९६ टक्के) वाढीसह २७.५१ डॉलर प्रति औंस झाली.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी