Gold Price Today: सोने-चांदीचे भाव पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचा भाव 

काम-धंदा
पूजा विचारे
Updated Nov 01, 2019 | 21:49 IST

Gold Price: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत आल्यानं सोन्याचे भाव मजबूत झाले. शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव पुन्हा वधारलेत. जाणून घ्या सोने-चांदीचे दर.

Representational image
Gold Price Today: सोने-चांदीचे भाव पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचा भाव   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • आंतराष्ट्रीय बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे शुक्रवारी सोन्याचे भाव वधारले आहेत.
  • . एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात 181 रूपयांनी वाढ झाली आहे.
  • सोन्याचा दर 39,395 रूपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे.

मुंबईः आंतराष्ट्रीय बाजारातून आलेल्या सकारात्मक संकेतांमुळे शुक्रवारी सोन्याचे भाव वधारले आहेत. एचडीएफसी सिक्योरिटीजनुसार शुक्रवारी देशाची राजधानी दिल्लीत सोन्याच्या भावात 181 रूपयांनी वाढ झाली आहे. त्यानंतर सोन्याचा दर 39,395 रूपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. गुरूवारी सोन्याचा दर 38, 214 रूपये प्रति 10 ग्रॅमच्या भाव इतका होता. 

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांनी म्हटलं की, 24 कॅरेट सोन्याचा दर दिल्लीत 181 रूपयांनी वाढला आहे. तर चांदीच्या दरात 279 रूपयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी चांदीचा दर 47,900 रूपये प्रति किलोग्रॅमवर पोहोचला. जो गुरूवारी 47,630 रूपये प्रति किलोग्रॅम असा होता. 

आंतराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याची किंमत मजबूत आहे. येथे सोन्याचा भाव 1513 डॉलर प्रति ओंस आणि चांदीचा भाव 18.13 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. अमेरिका आणि चीन यांमध्ये सुरू असलेल्या व्यापार करार बघता सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे.

पटेल यांनी म्हटलं की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात झालेली वाढ ही दोन देशांमधील व्यापार कराराबाबत असुरक्षिततेमुळे झाली आहे.अमेरिकेबरोबर कोणत्याही दीर्घ व्यापार कराराबाबत जेव्हा चीनने संदेश दिला तेव्हा सराफा किंमतींच्या किंमती वाढल्या. 

या वर्षांच्या अखेर इतकी होणार सोन्याची किंमत

बाजारातील विश्लेषकांच्या मते या वर्षाच्या अखेरीस सोन्याचा भाव ४२ हजार रुपये प्रति १० ग्रॅम होण्याची शक्यता आहे.  जिओपॉलिटिकल टेन्शन, रिझर्व बँककडून झालेली सोन्याची खरेदी आणि रुपयांची किंमत कमी होऊ शकते, त्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ होऊ शकते. 

Gold Price ४२ हजारांपर्यंत पोहचू शकते सोने

कॉम्ट्रेन्ज रिसर्चचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) गगनशेखर त्यागराजन यांनी सांगितले की, पश्चिम एशियामध्ये भू-राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्या वैश्विक घाऊक बाजारात सोन्याचा दर १६५० प्रति डॉलर आणि एमसीएक्स ४२००० रुपये जाऊ शकते. एमसीएक्समध्ये सोन्याचे ताजे दर ३७,९४१ प्रति दहा ग्रॅम आणि कॉमेक्सवर १५२०.९ डॉलर सुरू आहे. 

एबेन्स ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक बन्सल यांनी सांगितले की, अमेरिकन खासदारांनी २४ सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या औपचारिर महाभियोगची तयारीनंतर सोन्याला मजबूती आली होती. त्यांनी सांगितले की सोन्याचा हाजीर किंमती वाढ होण्याची आणि १४५८ डॉलरच्या वर जााण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी