Gold Price : सोने झाले स्वस्त, चांदीची किंमत घसरली, जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 239 रुपयांनी घट झाली आहे.

gold price today gold rate tumbles silver price tanks heavily 19 February 2021
सोने झाले स्वस्त, चांदीची किंमत घसरली  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 239 रुपयांनी घट झाली आहे.
  • राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,568 रुपये राहिले.

नवी दिल्ली :  शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार दिल्लीतील 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत (Gold Rate) प्रति 10 ग्रॅम 239 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 45,568 रुपये राहिले. सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार मागील सत्रात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,807 रुपये होती. सिक्युरिटीजनुसार शुक्रवारी दिल्लीत चांदीच्या भावातही मोठी घसरण झाली. दिल्लीत चांदी 723 रुपयांनी घसरून 67,370 रुपये प्रतिकिलोवर आली. मागील सत्रात चांदीची किंमत प्रति किलो 68,093 रुपये होती.   

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात 560 रुपये प्रति 10 ग्रॅमने घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 46,130 रुपये झाला. गेल्या सत्रात हा दर   46,690 रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 45,130 रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर 45,690  रुपये इतका होता. तर यासोबतच चांदीच्या भावात 300 रुपये प्रति किलोग्रॅमने घट झाली आहे. त्यामुळे 69,000 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 68,700 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
पुणे  ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
जळगाव  ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
कोल्हापूर ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
लातूर ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
सांगली ४६ हजार १३० ४६ हजार ६९०
बारामती  ४६ हजार १३० ४६ हजार ६९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
पुणे  ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
जळगाव  ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
कोल्हापूर ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
लातूर ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
सांगली ४५ हजार १३० ४५ हजार ६९०
बारामती  ४५ हजार १३० ४५ हजार ६९०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
पुणे  ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
जळगाव  ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
कोल्हापूर ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
लातूर ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
सांगली ६८ हजार ७०० ६९ हजार ०००
बारामती  ६८ हजार ७०० ६९ हजार ०००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी