Gold Price Today: सोने वाढले, चांदीचे भाव घसरले,  जाणून घ्या संध्याकाळचा भाव 

Today Retail Gold and Silver Rate| आजचे सोने चांदी दर । आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत सुधारणा झाल्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली.

gold price today gold shines up silver prices fall know the latest rate
Gold Price Today: सोने वाढले, चांदीचे भाव घसरले 
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत सुधारणा झाल्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली.
  • सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे.
  • आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,803 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.12 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे.

Today Retail Gold and Silver Rate| आजचे सोने चांदी दर । नवी दिल्ली :  एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातूंच्या किमतीत सुधारणा झाल्यामुळे राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही गुरुवारी सोन्याच्या दरात वाढ झाली. गुरुवारी दिल्लीत सोन्याचा भाव 112 रुपयांनी वाढून 47,050 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, मौल्यवान धातू मागील व्यापारी सत्रात 46,938 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

एकीकडे सोन्याच्या दरात वाढ होत असतानाच चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. चांदीचा भाव 203 रुपयांनी घसरून 63,767 रुपये प्रति किलो झाला. मागील व्यवहारात चांदीचा भाव 63,970 रुपये प्रति किलो होता.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने 1,803 डॉलर प्रति औंस आणि चांदी 24.12 डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांच्या मते, "यूएस बॉन्डचे कमी उत्पन्न आणि मिश्र जागतिक संकेत यांमुळे सोन्याच्या किमती पूर्वीच्या तोट्यापेक्षा जास्त वाढल्या आहेत."

सोन्याची फ्युचर्स किंमत

मजबूत स्पॉट मागणीमुळे सट्टेबाजांनी तयार केलेल्या नवीन पोझिशन्समुळे वायदा व्यवहारात गुरुवारी सोन्याचा भाव 18 रुपयांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमधील डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 18 रुपये म्हणजे 0.04 टक्क्यांनी वाढून 47,980 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. या कालावधीत 10,402 लॉटचे व्यवहार झाले. विश्लेषकांनी सांगितले की, सहभागींच्या ताज्या पोझिशनमुळे सोन्याच्या किमतीत वाढ झाली. न्यूयॉर्कमध्ये सोन्याचा भाव 0.27 टक्क्यांनी वाढून 1,803.70 डॉलर प्रति औंस झाला.


चांदीची फ्युचर्स किंमत

चांदीचा भाव गुरुवारी 109 रुपयांनी घसरून 65,056 रुपये प्रति किलो झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये डिसेंबरमध्ये डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव 109 रुपये म्हणजेच 0.17 टक्क्यांनी घसरून 65,056 रुपये प्रति किलोवर पोहोचला आणि 10,188 लॉटमध्ये विक्री झाली.

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
पुणे  ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
जळगाव  ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
कोल्हापूर ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
लातूर ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
सांगली ४८ हजार ०५० ४८ हजार १३०
बारामती  ४८ हजार ०५० ४८ हजार १३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
पुणे  ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
जळगाव  ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
कोल्हापूर ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
लातूर ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
सांगली ४७ हजार ०५० ४७ हजार १३०
बारामती  ४७ हजार ०५० ४७ हजार १३०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६५ हजार ००० ६४ हजार ८००
पुणे  ६५ हजार ००० ६४ हजार ८००
जळगाव  ६५ हजार ००० ६४ हजार ८००
कोल्हापूर ६५ हजार ००० ६४ हजार ८००
लातूर ६५ हजार ००० ६४ हजार ८००
सांगली ६५ हजार ००० ६४ हजार ८००
बारामती  ६५ हजार ००० ६४ हजार ८००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी