Gold Price : सोन्याचे भाव घसरले, चांदीने घेतली उसळी, जाणून घ्या संघ्याकाळचे हाजीर भाव

 Retail Gold and Silver Rate| बुधवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव खाली आला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 208 रुपयांनी घट झाली.

gold price today gold spot price on 3 march 2021 fell silver price rose sharply know prices
Gold Price:सोन्याचे भाव घसरले, चांदीने घेतली उसळी  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • बुधवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव खाली आला.
  • बुधवारी जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती खाली आल्या.
  • बुधवारी जागतिक पातळीवर चांदीच्या दरातही घट झाली.

नवी दिल्ली : बुधवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचा भाव खाली आला. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते राष्ट्रीय राजधानी दिल्लीत बुधवारी सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम 208 रुपयांनी घट झाली. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमसाठी  44,768 रुपयांवर आली आहे. सिक्युरीटीजच्या मते आंतरराष्ट्रीय पातळीवरील नरमाईमुळे देशांतर्गत पातळीवर सोन्याच्या किंमतीतील घट नोंदली गेली. विशेष म्हणजे मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 44,976 रुपयांवर बंद झाला होता.

दुसरीकडे चांदीच्या बुधवारी स्पॉटच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. चांदीच्या दरात 602 रुपयांची वाढ झाली. चांदीचा दर प्रतिकिलो 68,194 रुपये झाला आहे. विशेष म्हणजे मागील सत्रात चांदीचा दर 67,592 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले, "जागतिक स्तरावर सोन्याच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमुळे दिल्लीत बुधवारी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 208 रुपयांची घसरण झाली." ते म्हणाले की, बुधवारी भारतीय रुपयाने डॉलरच्या तुलनेत 45 पैशांची मजबूत व्यापार दर्शविला.

जागतिक स्तरावर सोन्याचे भाव

बुधवारी जागतिक पातळीवर सोन्याच्या किंमती खाली आल्या. ब्लूमबर्गच्या मते, कॉमेक्सवरील सोन्याचे जागतिक वायदा मूल्य बुधवारी 0.61 टक्क्यांनी म्हणजे 10.60 डॉलर खाली आले आणि ते 1723 डॉलर प्रति औंस र बंद झाले. त्याच वेळी, स्पॉट गोल्ड 0.69 टक्क्यांनी म्हणजे 11.98 डॉलर्सच्या खाली 1726.38 डॉलर प्रति औंसवर व्यापार झाला.

जागतिक स्तरावर चांदीची किंमत

बुधवारी जागतिक पातळीवर चांदीच्या दरातही घट झाली. ब्लूमबर्गच्या मते, कॉमेक्सवरील चांदीचे वायदा बुधवारी 0.74 टक्क्यांनी म्हणजे 0.20 डॉलर खाली येऊन 26.68 डॉलर प्रति औंस वर व्यापार झाला. त्याच वेळी चांदीची स्पॉट किंमत यावेळी औंस 0.60 टक्क्यांनी  म्हणजे 0.16 डॉलरने खाली घसरून 26 डॉलर प्रति औंसवर व्यापार करत असल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रातील सोने आणि चांदीचा भाव काय?

महाराष्ट्रात सोने आणि चांदीच्या भावात घट झाली आहे. राज्यात २४ कॅरेट सोन्याच्या भावात 50 रुपये प्रति 10 ग्रॅमने घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 45,370 रुपये झाला. गेल्या सत्रात हा दर 45,420 रुपये इतका होता. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव 44,370 रुपये प्रति झाला आहे. गेल्या सत्रात हा दर 44,420 रुपये इतका होता. तर यासोबतच चांदीच्या भावात 1300 रुपये प्रति किलोग्रॅमने वाढ झाली आहे. त्यामुळे 66,600 रुपये प्रति किलोग्रॅम असणारी चांदीची किंमत 67,900 रुपये प्रति किलोग्रॅम झाली आहे. 

पाहूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २४ कॅरेट सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम) 

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
पुणे  ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
जळगाव  ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
कोल्हापूर ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
लातूर ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
सांगली ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०
बारामती  ४५ हजार ३७० ४५ हजार ४२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील २२ कॅरेट  सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
पुणे  ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
जळगाव  ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
कोल्हापूर ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
लातूर ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
सांगली ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०
बारामती  ४४ हजार ३७० ४४ हजार ४२०

पाहू या महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील चांदीचा दर (प्रति किलोग्रॅम)

शहर आजचा दर कालचा दर 
मुंबई ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
पुणे  ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
जळगाव  ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
कोल्हापूर ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
लातूर ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
सांगली ६७ हजार ९०० ६६ हजार ६००
बारामती  ६७ हजार ९०० ६६ हजार ६००

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी