Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत झालेली वाढ, चांदीचीही चमकली, जाणून घ्या संध्याकाळचे भाव

मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढ झाली.

gold- price today gold spot price rise silver price also rise know prices on 6 april 2021
Gold Price : सोन्याच्या स्पॉट किंमतीत झालेली वाढ 

थोडं पण कामाचं

  •  मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या.
  • एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढ झाली.
  • डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि कोरोना विषाणूच्या साथीच्या चिंतेमुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला आहे.

नवी दिल्ली :  मंगळवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते मंगळवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या किमतींमध्ये प्रति 10 ग्रॅम 83 रुपयांनी वाढ झाली. या वाढीसह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 45,049 रुपयांवर पोहोचली आहे. सिक्युरीटीजच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्यामुळे देशांतर्गत बाजारातही वाढ झाली. विशेष म्हणजे मागील सत्रात सोन्याचा दर 10 ग्रॅम 44,966 रुपयांवर बंद झाला होता. (gold price today gold spot price rise silver price also rise know prices on 6 april 2021)

सोन्यासह चांदीच्या देशांतर्गत स्पॉटच्या किंमतीतही मंगळवारी वाढ नोंदविण्यात आली. मंगळवारी चांदीची किंमत 62 रुपयांनी वाढली आहे. चांदीची किंमत प्रति किलो 64,650 रुपये झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे मागील सत्रात चांदीचा भाव प्रति किलो 64,588 रुपये होता.

जागतिक स्तरावर सोन्याचे भाव

जागतिक पातळीवर सोन्याच्या दोन्ही वायदा आणि स्पॉट किमतींमध्ये मंगळवारी संध्याकाळी वाढ दिसून आली आहे. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी सोन्याचे जागतिक वायदेचे भाव कॉमेक्सवर 0.19 टक्क्यांनी म्हणजे 3.30 डॉलर प्रति औंसची वाढ होऊन 1,732.10 डॉलर प्रति औंस झाले. याव्यतिरिक्त सोन्याची जागतिक किंमत 0.19 टक्के म्हणजे 3.26 डॉलरने वाढ झाली आहे. सध्या सोन्याचा भाव 1,731.53  डॉलर प्रति औंस ट्रेड करत होता. 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटी) तपन पटेल म्हणाले की डॉलरच्या कमकुवतपणामुळे आणि कोरोना विषाणूच्या साथीच्या चिंतेमुळे सोन्याच्या किंमतींना आधार मिळाला आहे.

जागतिक स्तरावर चांदीची किंमत

मंगळवारी संध्याकाळी जागतिक पातळीवर चांदीच्या किमतीतही फ्युचर्स आणि स्पॉटच्या किंमतीत वाढ दिसून आली. ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी संध्याकाळी मे 2021 च्या चांदीचा भाव  0.69 टक्के म्हणजेच 0.17 डॉलरच्या वाढीसह 24.95 डॉलर प्रति औंसवर व्यापार झाल्याचे दिसून आले. त्याशिवाय चांदीची जागतिक पातळीवरील किंमत 0.38 टक्के किंवा 0.09 डॉलर प्रति औंसच्या तुलनेत 24.97 डॉलरवर व्यापार करत असल्याचे दिसून आले. (gold price today gold spot price rise silver price also rise know prices on 6 april 2021)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी