Gold Futures Price :  सोन्याच्या किंमतींवर पुन्हा ग्रहण, आज झाले इतके स्वस्त सोने

मंगळवारी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या. सकाळच्या व्यापार दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 70 रुपयांनी घसरून 47248 रुपयांवर आली.

gold price today in mumbai silver price today in mumbai gold rate 47248 per ten gram know mcx rates here
Gold Futures Price : सोन्याच्या किंमतींवर पुन्हा ग्रहण  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • मंगळवारी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या.
  • सकाळच्या व्यापार दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 70 रुपयांनी घसरून 47248 रुपयांवर आली.
  • सोमवारी सट्टेबाजांनी जोरदार मागणीमुळे नवीन सौदे खरेदी केल्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा दर (Gold rate) 424 रुपयांनी वाढून, 47,161 रुपये झाला.

 Gold Price , नवी दिल्ली :  मंगळवारी सोन्याच्या किंमती पुन्हा घसरल्या. सकाळच्या व्यापार दरम्यान मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 70 रुपयांनी घसरून 47248 रुपयांवर आली. त्याच वेळी चांदीच्या किंमतीत 27 रुपयांची वाढ झाली, त्यानंतर चांदीची किंमत 69,898 रुपये प्रति किलो(Silver price today)पर्यंत पोहोचली आहे. 


एमसीएक्सवर होता हा भाव 

यापूर्वी सोमवारी सट्टेबाजांनी जोरदार मागणीमुळे नवीन सौदे खरेदी केल्यामुळे स्थानिक फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा दर (Gold rate) 424 रुपयांनी वाढून, 47,161 रुपये झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) मध्ये जून महिन्यासाठी सोन्याची किंमत 424 रुपये म्हणजेच 0.91  टक्क्यांनी वाढून 47,161 रुपये प्रति १० ग्रॅम झाली. त्यात 10,558 लॉटमध्ये व्यापार झाला.  

बाजारात सौदे वाढले

पीटीआयच्या वृत्तानुसार, विश्लेषकांनी असे म्हटले आहे की सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी नवीन सौदे खरेदी केले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये सोन्याचे भाव 0.70 टक्क्यांनी वधारून ते 1,780 डॉलर प्रति औंस झाले. 

चांदीही वाढते

सोमवारी व्यापा-यांनी आपले सौदे वाढविले आणि त्यामुळे चांदीचा भाव 762 रुपयांनी वाढून 69,128 रुपये प्रति किलो झाला. जुलै महिन्यात डिलिव्हरीसाठी एमसीएक्स फ्युचर्स कराराचा भाव 762 रुपये किंवा 1.11 टक्क्यांनी वाढून 69,128 रुपये प्रति किलो झाला. या फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये 8,778 लॉटसाठी डील करण्यात आल्या.  


चांदीमध्ये तेजी 

वाढत्या देशांतर्गत मागणी दरम्यान व्यापाऱ्यांनी नवीन सौदे वाढविल्याने चांदीच्या वायदा किंमती वाढल्या असल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले. जागतिक पातळीवर न्यूयॉर्कमध्ये चांदी 1.11 टक्क्यांनी वधारून 26.16 डॉलर प्रति औंस झाली. 

दिल्लीत सोने चमकले

जागतिक बाजारपेठेतील मौल्यवान धातूंच्या किंमतींमध्ये सुधारणा आणि रुपयाच्या मूल्यातील घसरण यामुळे सोमवारी स्थानिक सराफा बाजारात सोन्याचे दर 310 रुपयांनी वाढून 46,580 रुपयांवर गेले. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, आदल्या दिवशीच्या व्यापारात सोन्याचा दर दहा ग्रॅम 46,270 रुपयांवर बंद झाला. 

चांदी सोन्याप्रमाणे चढली

चांदीदेखील 580 रुपयांनी वाढून 67,429 रुपये प्रति किलो झाली. मागील व्यापार सत्रात ते 66,849 रुपयांवर बंद झाले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिऔंस 1777 डॉलर झाला, तर चांदीचा भाव 26.06  डॉलर प्रति औंस झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी