Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहेत नवे दर

Gold Rate Today: सोने - चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. जाणून घ्या काय आहे सोने-चांदीचा नवा दर...

Representative Image
Gold Price Today: सोने-चांदीच्या दरात घसरण, जाणून घ्या काय आहेत नवे दर (प्रातिनिधिक फोटो)  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोने-चांदीच्या दरात घसरण
  • सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Today's Latest Gold Price: आंतरराष्ट्रीय बाजारात मागणीत घसरण झाल्याने सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी (23 फेब्रुवारी 2023) घसरण झाल्याचं पहायला मिळालं. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याचं दिसून आलं. जाणून घ्या फ्युचर्स मार्केटमध्ये सोने-चांदीचा भाव काय आहे.

फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव काय

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर एप्रिल 2023 मध्ये डिलिव्हरीच्या सोन्यात 253 रुपये म्हणजेच 0.45 टक्क्यांनी घसरण झाली. या घसरणीमुळे सोन्याचा भाव 55,830 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला आहे. यासोबतच गेल्या सत्रात एप्रिलचा कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सोन्याचा भाव 56,083 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता.

हे पण वाचा : भारतातील या नदीचं कुणीही पित नाही पाणी, काय आहे कारण?

याच प्रकारे जून 2023 मध्ये डिलिव्हरीच्या सोन्यात 256 रुपये म्हणजेच 0.45 टक्क्यांनी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. यामुळे सोन्याचा भाव 56,180 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. यापूर्वी गेल्या सत्रात जून महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असलेल्या सोन्याचा भाव 56,436 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता.

हे पण वाचा : स्पर्म डोनेट करा अन् 82 हजार रुपये मिळवा

फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीचा भाव

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर मार्च 2023 मध्ये डिलिव्हरी असलेल्या चांदीच्या भावात 407 रुपये म्हणजेच 0.62 टक्क्यांनी घसरण झाली. या घसरणीमुळे चांदीचा भाव 65,031 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला होता. गेल्या सत्रात मार्च महिन्यातील डिलिव्हरी असलेल्या चांदीची किंमत 65,438 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी झाली होती.

हे पण वाचा : मधुमेह असल्यास कोणती फळे खावीत?

अशाच प्रकारे मे 2023 मध्ये डिलिव्हरी असलेल्या चांदीच्या भावात 341 रुपये म्हणजेच 0.51 टक्के घसरणीसह 66,411 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार होत होता. यापूर्वी गेल्या सत्रात मार्च कॉन्ट्रॅक्ट असलेली चांदीची किंमत 66,762 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती.

जुलै कॉन्ट्रॅक्ट असलेल्या चांदीच्या भावात 301 रुपये म्हणजेच 0.44 टक्के घसरणीसह 67,600 रुपये प्रति किलोग्रॅमवर व्यापार होत होता. यापूर्वी गेल्या सत्रात जुलै कॉन्ट्रॅक्ट असलेल्या असलेली चांदीची किंमत 67,901 रुपये प्रति किलोग्रॅम इतकी होती.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी